'हा' बॉलिवूड अभिनेता रियासोबत काम करण्यासाठी तयार, म्हणाला - आम्ही वाट बघू....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:07 AM2020-09-09T11:07:32+5:302020-09-09T11:10:16+5:30

आता अभिनेता-निर्माता निखील द्विवेदीने रियासाठी काही ट्विट्स केले आहेत. ज्यात निखीलने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.

Producer-Acor Nikhil Dwivedi offers Rhea Chakraborty a role in film when all this over | 'हा' बॉलिवूड अभिनेता रियासोबत काम करण्यासाठी तयार, म्हणाला - आम्ही वाट बघू....

'हा' बॉलिवूड अभिनेता रियासोबत काम करण्यासाठी तयार, म्हणाला - आम्ही वाट बघू....

googlenewsNext

रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनात समोर येत आहेत. अनेकांनी रियाच्या टी-शर्टवरील मेसेज सोशल मीडियात शेअर करून तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे. आता अभिनेता-निर्माता निखील द्विवेदीने रियासाठी काही ट्विट्स केले आहेत. ज्यात निखीलने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.

निखिल द्विवेदीने ट्विटमध्ये लिहिले की, 'रिया, मी तुला ओळखत नाही. मला नाही माहीत तू कशाप्रकारणी व्यक्ती आहे. कदाचित तू तेवढी वाईट आहेस, जेवढी तुला दाखवलं जात आहे. कदाचित नसशीलही. मला केवळ हे माहीत आहे की, तुझ्यासोबत जे होत आहे ते फार चुकीचं आहे. बेकायदेशीर आहे. जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल'.

त्यानंतरच्या एका ट्विटमधून निखिलला ट्रोल करण्यात आलं. यावर त्याने उत्तर दिलं की, कोर्टाने रियाला दोषी ठरवलंय का? जर त्यांनी ठरवलं तरी आपण रियात सुधार होण्याची वाट बघू. जर रियात काहीच सुधारणा झाली नाही तर मी माझे शब्द परत घेईन. पण मीडिया आणि जनतेने आपला निर्णय सुनावण्याची गरज नाही. माझं समर्थन #Innocentuntilprovenguilty च्या साठी आहे. #RheaChakraborty साठी नाही.

निखिल द्विवेदी म्हणाला की, रिया केसमध्ये टीव्ही स्टुडिओ आणि सोशल मीडियाने आपलं जजमेंट पास केलंय. जे आता बंद व्हायला पाहिजे. निखिलने स्पष्ट केलं की, तो ड्रग यूजर किंवा ड्रग पेडलर्सना सपोर्ट करत नाहीये. ना तो रियाला सपोर्ट करतोय. पण कोर्टाच्या निर्णयाआधी ज्याप्रकारे रियाला दोषी ठरवण्यात आलं तो त्याचा विरोध करतो.

दरम्यान,  बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी रियाच्या अटकेनंतर तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर एक खासप्रकारचा मेसेज शेअर करून तिला सपोर्ट केलय. 

मंगळवारी रिया चक्रवर्तीला अटकेनंतर चांगलीच चर्चा रंगली. तसेच तिने घातलेल्या टी-शर्टवरील टेक्स्टही चांगलीच चर्चेत राहिलं. त्यावर लिहिलं होतं की, 'गुलाब लाल असात, वॉयलेट्स निळे असतात, आपण सगळे मिळून पितृसत्तेचा हा किल्ला उद्धवस्त करू'.  आता रियाच्या टी-शर्टवरील हा मेसेज तिच्या समर्थनाचं माध्यम ठरला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीने हा संदेश शेअर करून रियाला सपोर्ट केलाय आणि तिच्या अटकेला विरोध केलाय.

अनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिबानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या संदेशाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेलिब्रिटींनी #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हे हॅशटॅग वापरले. जे आता ट्रेन्ड करत आहेत.

हे पण वाचा :

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचं कॅम्पेन, अभिनेत्रीसाठी केली न्यायाची मागणी

सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

Web Title: Producer-Acor Nikhil Dwivedi offers Rhea Chakraborty a role in film when all this over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.