Join us  

भावा, मी आधी माझा इन्शुरन्स...! अंडरटेकरचं चॅलेंज अन् अक्कीचा मजेशीर रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 9:58 PM

अंडरटेकरनं अक्षयसाठी केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा झाली... अंडरटेकरच्या या ट्विटवर अक्षय काय उत्तर देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

ठळक मुद्देअक्षय कुमारची ही पोस्ट  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच  लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केलं होतं.  

अक्षय कुमारनं (Akshay Kumar) एखादी पोस्ट टाकली अन् ती व्हायरल झाली नाही, हे शक्यच नाही. या आठवड्यात अक्कीच्या ‘खिलाडीयों का खिलाडी’ या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने अक्षयनं एक मीम शेअर केलं आणि अपेक्षेनुसार ते तुफान व्हायरल झालं. इतकंच नाही तर डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर द अंडरटेकरचं या मीमवर उत्तरही आलं. उत्तरादाखल काय तर, अंडरटेकरनं ( The Undertaker ) थेट अक्कीला रिअल फाईटसाठी आव्हान दिलं. मी तयार आहे, तू रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग..., असं अंडरटेकरनं या मीमवर रिप्लाय देताना लिहिलं. जगप्रसिद्ध रेसलरचा रिप्लाय म्हटल्यावर त्याची चर्चा होणारचं ना राव! अंडरटेकरनं अक्षयला दिलेल्या या रिप्लायची जोरदार चर्चा झाली, मग काय तर अंडरटेकरच्या या ट्विटवर अक्षय काय उत्तर देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आता अंडरटेकरच्या या ट्विटला अक्कीने भलतंच मजेशीर उत्तर दिलंय.‘ भावा मी आधी माझा इन्शुरन्स चेक करतो आणि मग तुला कळवतो,’ असं अक्कीनं अंडरटेकरला उत्तर देतांना लिहिलं आहे. (The Undertaker challenges Akshay Kumar for a rematch)

काय होतं मीमबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा   ‘खिलाडीयों का खिलाडी’ या सिनेमात एक फाईट सीन आहे. डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन रेसलर ‘द अंडरटेकर’ याच्यासोबतचा  या सिनेमातील अक्षयचा हा फाईट सीन्स चांगलाच गाजला होता. सिनेमात अक्षयनं चक्क अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या सिनेमाला अलीकडे 25 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने अलीकडे अक्षयनं एक मजेदार मीम शेअर केलं होतं. ज्यांनी ज्यांनी द अंडरटेकरला हरवलंय, त्यांनी त्यांनी हात वर करा,  अशा आशयाचे हे मीम होते आणि त्याखाली कोलाजमध्ये अनेकांचे फोटोही होते. यात अक्षय कुमारचाही हात वर केलेला फोटो होता. अक्षयच्या याच मीमला उत्तर देत, अंडरटेकरनं अक्षरला रिअल फाईटचं आव्हान दिलंय.  डब्ल्यूडब्ल्यूई इंडियानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर अंडरटेकरनं अक्षयला दिलेल्या रिप्लायचे ट्विट शेअर केलं होतं. रिअल अंडरटेकर विरूद्ध अक्षय कुमार, होऊन जाऊ द्या, असे हे ट्विट शेअर करताना डब्ल्यूडब्ल्यूई इंडियानं लिहिलं होतं.

अक्कीनं अंडरटेकरला हरवलंच नव्हतं...!!

‘खिलाडीयों का खिलाडी’ चित्रपटात अक्षय कुमारने फाईटमध्ये द अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र अलीकडे अक्षय कुमारने या चित्रपटातलं एक सत्य समोर आणलं होतं.‘खिलाडियों का खिेलाडी चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मजेदार सत्य हे आहे की, या चित्रपटात द अंडरटेकरची भूमिका रेसलर ब्रायन ली याने केली होती,’ असे अक्षयने लिहिले होते. म्हणजेच काय तर या चित्रपटात अक्षय कुमारने ज्याला हरवलं होतं तो द अंडरटेकर नसून त्याची भूमिका करणारा रेसलर ब्रायन ली होता.अक्षय कुमारची ही पोस्ट  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच  लाखो लोकांनी या पोस्टला लाइक केलं होतं.  

टॅग्स :अक्षय कुमारअंडरटेकर