अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणूनच जॉर्जिया एंड्रियानी ओळखली जाते. जॉर्जिया इटालियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. 2017 मध्ये मलायका अरोरा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवसातच अरबाज आणि जॉर्जियाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. तसंच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टवरुन ते दोघेही डेट करत असल्याचे समोर आले होते.जॉर्जिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. जॉर्जिया सध्या इटलीमध्ये वेळ घालवत आहे. ती इटलीमध्ये असली तरी तिथून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
जॉर्जियाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. व्हॅकेशनदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणता व्हायरल होत आहेत. युजर्सच्या नजरा सध्या तिच्या फोटोंवरच खिळल्या आहेत. जॉर्जिया तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते.सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये जॉर्जिया बिचवर एन्जॉय करताना दिसते. यावेळी ती बिकीनमध्ये असल्यामुळे ती अतिशय स्टायलिश दिसते.
समोर आलेल्या फोटोंमध्ये ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज दिल्याचे पाहायला मिळतंय. जॉर्जियाने अशाप्रकारचे फोटो पहिल्यांदाच शेअर केलेत, असं नाही. तिने यापूर्वीही ग्लॅमरस लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी नेहमीप्रमाणे सोशल मीडिया फॉलोअर्सना फॅशन गोल देत असल्याचे पाहायला मिळतंय.फोटोंना तिने कॅप्शनही दिले आहे.आगामी काळात जॉर्जिया श्रेयस तळपदेसोबत 'वेलकम टू बजरंगपूर'मधून रसिकांच्या भेटीला येणार आहे.