Join us

अॉस्कर बॉय सनी पवाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

ऑस्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं.

ऑस्कर बॉय सनी पवारने मुंबईत दाखल होताच उद्धव ठाकरेंची जाऊन मातोश्रीवर भेट घेतली. सनी पावर आज सकाळीच ऑस्करवारी करुन मुंबईत परतला आहे. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं. सनी मातोश्रीवर दाखल होताच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सनीचे संपूर्ण कुटुंबीय त्याच्याबरोबर उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सनीचा फुलांचा बुके देऊन स्वागत केले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्या ठाकरेही उपस्थित होते. सेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर गर्दी केली होती.सनीच्या कामगिरीचे जगभरातून कौतुक होते आहे. लायन चित्रपटाचे चित्रिकरण ज्यावेळी झाले तेव्हा सनी अवघ्या 5 वर्षांचा होता.सरूच्या भूमिकेसाठी अनेक शाळांमधून दोन हजारांपेक्षाही अधिक मुलांचे ऑडिशन घेतले होते. मात्र सनीला पाहाताच क्षणी ग्रॅथ डॅव्हिसने त्याची निवड केली.सनीचे ऑडिशन घेत असताना मी हा चित्रपटच पाहात होतो असे मला वाटत होते असे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितले.