Join us

ट्विंकल खन्ना म्हणते, सोशल मीडियावरचे ट्रोलर्स हे झुरळांसारखे...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 15:05 IST

अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती अशी ओळख असलेली  ट्विंकल खन्ना तिच्या परखड बोलण्यासाठीही ओळखली जाते. लग्नानंतर अभिनयाला कायमचा रामराम ठोकून ...

अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती अशी ओळख असलेली  ट्विंकल खन्ना तिच्या परखड बोलण्यासाठीही ओळखली जाते. लग्नानंतर अभिनयाला कायमचा रामराम ठोकून  ट्विंकल लेखनाकडे वळली. पुढे निर्मातीही झाली. पण याकाळात ती सर्वाधिक चर्चेत राहिली ती तिच्या ट्विट्स अन् वक्तव्यांनी. होय, ‘मिसेस फनी बोन्स’  ट्विंकलने आत्ताही असेच काहीसे मत मांडले आहे. ज्यावरून ती पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. होय, सोशल मीडियावरचे ट्रोलर्स म्हणजे, झुरळाची प्रजाती आहे, असे तिने म्हटले आहे. प्रत्येकाची खिल्ली उडवणे या लोकांना (ट्रोलर्स) अतिशय आवडते. तुम्ही त्यांची खिल्ली जितकी गंभीरपणे घ्याल, तितका त्यांना तेव चढतो.  त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे मी मूर्खपणा मानते. ट्रोलर्सची ही जमात झुरळासारखी असते. स्प्रे मारला की ते लगेच रस्त्यातून नाहीसे होतात. त्यामुळे ही झुरळं दूर करायची असतील तर त्यावर स्प्रे मारत राहावे लागेल, असे  ट्विंकल म्हणाली.कधीकाळी ट्विंकलनेही एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले होते. पण यात ती अपयशी ठरली. ‘बरसात’,‘जब प्यार किसीसे होता है’,‘मेला’,‘बादशहा’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. पण तिचे हे सिनेमे बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले आणि ट्विंकलवर ‘फ्लॉप हिरोईन’चा शिक्का बसला. पण ट्विंकलने कधीच हा शिक्का पुसण्याचे प्रयत्न केले नाहीत. कारण तिला याचा कुठलाच पश्चाताप नाही.अलीकडे एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते. मी एकही हिट सिनेमा दिला नाही. हे सत्य आहे. पण मला त्याचा पश्चाताप नाही. मी कलाकार म्हणून नाही पण एक लेखिका म्हणून यशस्वी झालेय. कदाचित मी एक चांगली लेखिका आहे. हे करिअर आयुष्यभर माज्यासोबत असणार आहे, ही एकच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे, असे ती म्हणाली होती.ALSO READ ;जर ‘हा’ चित्रपट हिट झाला असता, तर अक्षय-ट्विंकलचे लग्न झालेच नसते!!अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यावर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने इंटिरियर डिझाईनिंगमध्ये काम करणे सुरु केले. शिवाय लिहायला लागली. तिचे ‘मिसेस फनी बोन्स’ हे पुस्तक चांगलेच गाजले. आज एक स्तंभलेखिका अशीही ट्विंकलची ओळख आहे.