Join us

Trouble in paradise : ​हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खानचे ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 13:21 IST

तूर्तास सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून साराच्या ...

तूर्तास सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चेपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच अधिक चर्चा होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून साराच्या रिलेशनशिपची चर्चा सुुरु आहे. होय, अनिल कपूरचा लाडका मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सारा अली खान या दोघांच्या डेटींगच्या बातम्या अलीकडे ऐकू येत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसलेत. पण आता एक ताजी खबर आहे. होय, हर्षवर्धन व साराचे ब्रेकअप झाल्याचे कळतेय. अर्थात या ब्रेकअपमागचे कारण कळलेले नाही.ALSO READ : सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर?एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा आणि हर्ष दोघांचेही नाते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. निश्चितपणे ही बातमी आश्चर्याचा धक्का देणारी आहे. सारा व हर्षमध्ये असे अचानक का बिनसले, हा खरे तर कळीचा मुद्दा आहे. पण बॉलिवूडमध्ये लोक जवळ यायला आणि दूर जायला वेळ लागत नाही. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्रेकअपमागचे कारण धक्कादायक असतात. सारा व हर्षच्या ब्रेकअपमागेही असेच काही धक्कादायक कारण न निघो, इतकेच. काही दिवसांपूर्वी सारा व हर्ष अंधेरितल्या एका रेस्टॉरंटमध्ये दिसले होते. त्यांचे नाते एकमेकांना बेबी संबोधण्याइतके समोर गेल्याचे यावेळी दिसले होते. मध्यंतरी हर्ष साराच्या घराबाहेर दिसला होता. तोही मध्यरात्री. यानंतर दोघांच्याही डेटींगच्या बातम्यांना जोर चढला होता. आता अचानक या जोडीच्या ब्रेकअपची बातमी आल्याने त्यांचा चाहत्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे.   ही बातमी अफवा निघो, असेच तुमच्याप्रमाणे आम्हालाही वाटते आहे. आता पुढे काय बातमी येते, ते बघूच.साराने अलीकडे ‘केदारनाथ’ हा चित्रपट साईन केला आहे. अभिषेक कपूरच्या या चित्रपटात सारा सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसणार आहे. आता हर्ष