Join us  

काकांशी लग्न कधी करताय मॅडम तुम्ही? आमिर-किरणचा घटस्फोट अन् ट्रोल होतेय फातिमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:33 PM

फातिमानं नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला आणि लोकांनी आमिरबद्दल प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं.  

ठळक मुद्दे‘दंगल’ सिनेमानंतर अचानक आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण रावने (Kiran Rao)अचानक घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाच धक्का बसला. आमिर व किरणने असा निर्णय का घेतला, ते अद्याप कळायला मार्ग नाही. पण  हो या घटस्फोटाचा थेट संबंध बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिच्याशी जोडला गेला. फातिमा व आमिरचं नाव जोडलं गेलं. इतकंच काय, लोकांनी फातिमाला ट्रोलही केलं. अद्यापही हे ट्रोलिंग सुरू आहे. फातिमानं नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला आणि लोकांनी आमिरबद्दल प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं. (Aamir Khan, Kiran Rao divorce) 

आमिर खानशी लग्न कधी करताय मॅडम तुम्ही?  काकांशी लग्न कधी करताय? असे प्रश्न अनेकांनी तिला विचारले. ‘दंगल’ सिनेमानंतर अचानक आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमिरची फातिमासोबतची वाढती जवळीक पाहून किरण नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं सांगत फातिमाने पुढे यावर बोलणं टाळलं होतं.

 

आमिरचं स्थान माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मला स्वत:वर परिणाम करून घ्यायचा नाही, असंही फातिमा म्हणाली होती.  आमिरसोबतचं फातिमाचं नातं असल्याचं वृत्त खुद्द आमिरची पत्नी किरणनंही फेटाळून लावलं होतं. आमिरनं मात्र या चर्चांवर कायम चुप्पी साधली होती. आता इतक्या वर्षानंतर मात्र या चर्चांना पुन्हा जोर चढला आहे. आमिर व किरणच्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा आमिर व फातिमा यांचं नाव जोडलं जातंय. हेच कारण आहे की, आमिरनं घटस्फोटाची घोषणा केली त्यावेळी फातिमा टिष्ट्वटरवर ट्रेंड करत होती. 

टॅग्स :फातिमा सना शेखआमिर खान