Join us

‘ट्रिपल एक्स’ २० जानेवारी २०१७ ला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 21:40 IST

 हॉलीवूडमधील अ‍ॅक्शन चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ याची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हापासून भारतात चित्रपटाविषयी ...

 हॉलीवूडमधील अ‍ॅक्शन चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ याची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हापासून भारतात चित्रपटाविषयी जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपट पूर्णपणे अ‍ॅक्शनवर आधारित असल्यामुळे दीपिका पदुकोनला यात घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. तिच्यासोबत यात विन डिजेल देखील असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे सर्व फोटो, सेटवरील फोटो, व्हिडिओ, डबस्मॅश यांना विशेष पसंती सोशल मीडियावर मिळत आहे. आता चाहत्यांना वेगळीच उत्सुकता लागली आहे ती म्हणजे चित्रपट रिलीज केव्हा होणार याची? तर नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट फायनल झाली आहे. दिग्दर्शक डीजे करूरो यांचा हा चित्रपट २० जानेवारी २०१७ रोजी रिलीज होणार आहे. टिवटरवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. }}}}}}}}