Join us  

Trending: शिल्पा शेट्टी भडकली आणि या अभिनेत्याच्या लगावली कानशिलात, व्हिडीओमुळे आले सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 3:25 PM

शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. यापठोपाठ आता ती तिचे कॉमेडी व्हिडीओ टीकटॉकवर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

शिल्पा नवरोबाच्या कानशिलात लगावत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. शिल्पा नव-याच्या कानाखाली मारत असल्याचा व्हिडीओ सध्या जाम चर्चेत आहे. एवढेच नाही तर लायकीत राहा, तू माझा नवरा आहेस, असेही ती त्याला बजावते. बिचारा राज यानंतर गाल चोळत बसतो. अर्थात काही वेळात शिल्पा राजला प्रेमाने मिठी मारते. या व्हिडिनंतर शिल्पाचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ति अभिनेता राजपाल यादवच्या कानशिलात मारल्याचे  दिसते, शिल्पाचा हा दबंग कॉमेडी अंदाज चांगला धुमाकुळ घालत आहे. 

हा व्हिडीओ पाहून चाहते लोटपोट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिल्पा नेहमीच तिच्या सोशल मीडियावर योगा टीप्स देत असल्याचे पाहायला मिळते. शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. यापठोपाठ आता ती तिचे कॉमेडी व्हिडीओ टीकटॉकवर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिच्या प्रत्येक व्हिडीओला रसिकांचे खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.

शिल्पा शेट्टी तिच्या खाजगी कारणामुळेही चर्चेत असते. शिल्पा पुन्हा एकदा आई झाली, या वृत्ताने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खळबळ माजली होती. शिल्पा शेट्टीला यापूर्वी एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे वियान. वियाननंतर आता शिल्पाच्या घरी छोट्या चिमुकलीचं आगमन झालं आहे. शिल्पाने या मुलीचं नाव समीशा ठेवलं आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराजपाल यादव