‘वॉरहिरो’ होण्यासाठी मोहित घेतोय ट्रेनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 17:28 IST
चित्रपटांमध्ये स्टंट करणं काही सोप्पं काम नाही. एका सीनसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा कुठे तो सीन प्रेक्षकांना आवडतो. ...
‘वॉरहिरो’ होण्यासाठी मोहित घेतोय ट्रेनिंग!
चित्रपटांमध्ये स्टंट करणं काही सोप्पं काम नाही. एका सीनसाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा कुठे तो सीन प्रेक्षकांना आवडतो. विशेष भूमिकेसाठी कलाकारांनाही खास ट्रेनिंगमधून जावे लागते. अभिनेता मोहित मारवाह हा दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांच्या आगामी चित्रपटात भारतीय आर्मी आॅफिसरच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात त्याची भूमिका खरी वाटण्यासाठी तो सध्या ट्रेनिंग घेत आहे. चित्रपटासाठी घेत असलेल्या मेहनतीविषयी बोलताना मोहित सांगतो,‘मी सध्या आर्मी स्टाईल बूट कॅम्प मध्ये ट्रेनिंग घेत असून भारतीय राष्ट्रीय आर्मीविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करतो आहे. माझी भूमिका उठावदार दिसण्यासाठी मला आर्मीविषयीची माहिती असणे गरजेचे आहे.’ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीच्या कथानकावर आधारित चित्रपट असून यात मोहित वॉरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१४ मध्ये ‘फुगली’ चित्रपटातून मोहित मारवाह याने डेब्यू केला होता.