Join us  

इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर...!! ‘शकीला’च्या ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:15 AM

येत्या 25 डिसेंबर रोजी हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रिन्सवर ‘शकीला’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

ठळक मुद्देअडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या 20 व्या वर्षी 1995  साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या ‘शकीला’ हा आगामी सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. याचदरम्यान या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. सध्या सोशल मीडियावरही केवळ या आणि याच ट्रेलरची चर्चा आहे. या सिनेमात रिचा शकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. एक सामान्य मुलीचा अ‍ॅडल्ट स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास यात दिसणार आहे.ट्रेलरची सुरुवात होते ती अ‍ॅडल्ट स्टार सिल्क स्मिताने विष घेऊन आत्महत्या केल्याच्या एका बातमीने आणि इथून सुरु होतो, आणखी एक अ‍ॅडल्ट स्टारचा प्रवास. शकीला (रिचा चड्ढा)च्या वडीलांचा मृत्यू होतो आणि यानंतर तिची आई तिला शहरात घेऊन येते.

‘इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर बिकना होगा या फिर तुझे परदे पर...,’ असे आई शकीलाला म्हणते. आईने दाखवलेल्या वाटेवर चालत शकीला सिनेमात येते आणि सिल्क स्मिताची जागा घेते.   पंकज त्रिपाठी यांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो, सोबत पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा खडतर प्रवासही दिसतो. हा 3 मिनिटे 39 सेकंदाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा ट्रेलर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा ट्रेलर पाहताना सतत विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’ची आठवण येते. कारण दोन्ही सिनेमे एका समान पार्श्वभूमीवर दोन महिलांवर बनलेले आहेत.

अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या 20 व्या वर्षी 1995  साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. 90 च्या दशकात शकीला ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने 250हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शकीलाचे प्रचंड चाहते होते. तिचा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार त्यादिवशी इतर अभिनेते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणे टाळायचे.  

टॅग्स :शकीला बायोपिकरिचा चड्डा