Trailer Launch : वेंधळ्या ‘नूर’चा पहा हटके अंदाज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 16:01 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरवरून सिनेमात नेमकं काय दडलंय याचा अंदाज बांधणे प्रेक्षकांना शक्य होत आहे.
Trailer Launch : वेंधळ्या ‘नूर’चा पहा हटके अंदाज...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, ट्रेलरवरून सिनेमात नेमकं काय दडलंय याचा अंदाज बांधणे प्रेक्षकांना शक्य होत आहे. दरम्यान, या ट्रेलरने धूम उडवून दिली असून, प्रेक्षकांना सिनेमाविषयी आतुरता निर्माण होत असताना दिसत आहे. गेल्या मंगळवारी सोनाक्षीने सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले होते. त्याचबरोबरच लवकरच ट्रेलर रिलीज केला जाणार असल्याचे संकेतही दिले होते. दोन मिनिटे २१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सोनाक्षी वेंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. जी एक जर्नालिस्ट असते, परंतु स्वत:ला जोकर जर्नालिस्ट म्हणत असते. कारण ट्रेलरमधील ‘नूर’ तिच्या वाटेत आलेल्या प्रत्येक वस्तूला धडकते. थोडक्यात त्या वस्तूची नासधूस करते. त्यामुळे तिला स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार वाटतो. मात्र तिचा हा वेंधळेपणा बघून प्रेक्षकांना नक्कीच हसायला येईल. कारण तिची भूमिका अतिशय खोळकर असून, ती चक्क सनी लिओनीचा इंटरव्ह्यू करण्यासाठी धडपड करीत असते. मात्र ट्रेलरच्या अखेरीस तिच्या आयुष्यात बराचसा बदल झाल्याचे दिसून येते. ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. अशा या ‘नूर’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमातदेखील एका जुन्या गाण्याचे रिमिक्स दाखविले जाणार आहे. १९७० मधील ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी...’ या सुपरहिट गाण्याच्या रिमिक्सवर सोनाक्षी थिरकताना बघावयास मिळणार आहे. १९७० च्या ‘द ट्रेन’ या सिनेमात राजेश खन्ना आणि नंदा यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. सुनील सिप्पी दिग्दर्शित हा सिनेमा पाकिस्तानी लेखक सबा इम्तेयाजी यांच्या ‘कराची-यू आर किलिंग’ या कादंबरीवर आधारित आहे. हा सिनेमा २१ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात यू-ट्यूब कॉमेडियन कनन गिल आणि अभिनेता पूरब कोहली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ">http:// दरम्यान, सोनाक्षी सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, सध्या ती अतिशय हटके अंदाजात लोकांपर्यंत जात आहे. मुंबईमध्ये एका रंगारंग कार्यक्रमात सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलरने सध्या यू-ट्यूबवर धूम उडवून दिली आहे.