Join us

आदित्य मोटवानीच्या 'ट्रॅप्ड'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:25 IST

दिग्दर्शक आदित्य मोटवानी याचा आगामी चित्रपट ट्रॅप्डचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

दिग्दर्शक आदित्य मोटवानी याचा आगामी चित्रपट ट्रॅप्डचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. राजकुमार राव या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'अलीग़ढ' चित्रपटातील अभिनयासाठी राजकुमारला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते.गेल्या वर्षी झालेल्या 18 व्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने स्टैंडिंग ओवेशन घेतले होते.मुंबईतल्या एका इमरातीत अडकलेल्या एका माणसाची ही गोष्ट आहे. त्या आपल्या खोलीतून बाहेर पडायचे आहे मात्र चावी घराबाहेर आहे. बाहेरून कुणीतरी मदतीला येईल या आशेने तो अनेक शकली लढवितो, मात्र त्याच्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही.यावेळी राजकुमार राव आणि दिग्दर्शक आदित्य मोटवानी मस्तीच्या मूडमध्ये दिसले.