Join us  

पहिल्याच दिवशी ‘वेनम’ने ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ला दिली मात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:37 PM

आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. 

आज शुक्रवारी चित्रपटगृहात तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. यात एक आहे, हॉलिवूडचा चित्रपट ‘वेनम’ आणि अन्य दोन आहेत, बॉलिवूडचे ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’. या तिन्ही चित्रपटांचा जॉनर भिन्न आहे. साहजिकचं या तिन्ही चित्रपटांचा आपआपला प्रेक्षकवर्ग आहे. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. होय, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘वेनम’ या हॉलिवूडपटानेअंधाधुन’ व ‘लवयात्री’ या दोन्ही बॉलिवूडपटांना मागे टाकत बाजी मारली आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्टनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेनम’च्या मॉर्निंग शोचा आॅक्यूपेन्स रेट सुमारे ३० टक्के राहिला तर ‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ या चित्रपटांचा २० टक्के.समीक्षकांचे मत जाणाल तर ‘वेनम’ला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामुळे वीकेंडमध्ये या चित्रपटाच्या कमाईत फार वाढ होणार नाही, असे मानले जात आहे. याऊलट ‘अंधाधुन’ला समीक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे़.तर ‘लवयात्री’ला ठीक-ठीक यादीत टाकले आहे. वीकेंडला हे दोन्ही चित्रपट चांगली कमाई करतील असा अंदाज आहे. यातही ‘अंधाधुन’चे पारडे सर्वाधिक जड आहे. कथा, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन अशा सर्वच बाबतीत हा चित्रपट सरस ठरला आहे. अर्थात सिंगल स्क्रिन्सवर ‘लवयात्री’ अधिक यशस्वी ठरेल, असाही कयास आहे. कारण सिंगल स्क्रिन्सच्या प्रेक्षकांना हवा तो सगळा मसाला या चित्रपटात आहे.

टॅग्स :अंधाधुनलवरात्रिहॉलिवूड