तैमूर सैफ अली खान आणि करिना कपूरसोबत व्हॅकेशनवर रवाना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 11:09 IST
सैफ अली खान आपली बेगम करिना कपूर आणि छोटे नवाब तैमूर अली खानसोबत व्हॅकेशनवर गेला आहे. सध्या पौतडी फॅंमिली ...
तैमूर सैफ अली खान आणि करिना कपूरसोबत व्हॅकेशनवर रवाना!
सैफ अली खान आपली बेगम करिना कपूर आणि छोटे नवाब तैमूर अली खानसोबत व्हॅकेशनवर गेला आहे. सध्या पौतडी फॅंमिली स्वित्झर्लंडला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रवाना झाली आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिना आणि सैफला एकत्र फारसा वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही आहे. त्यामुळे सैफच्या चित्रपटांची शूटिंग पूर्ण होताच तो करिनाला घेऊन बाहेर व्हॅकेशनवर गेला आहे. सैफ, करिना आणि तैमूर स्वित्झर्लंडच्या रॉयल जीस्टैड पॅलेसमध्ये राहणार आहे. पुढचे 2 आठवडे त्यांचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे. सैफ आणि करिनाने या ठिकाणी आधीचे बुकींग केली आहे. सैफ आणि करिनाचे हे फेव्हरेट व्हेकेशन डेस्टिनेशन आहे. लग्नानंतर दोघे बराचवेळा याठिकाणी जात असतात. करिनाचे म्हणणे आहे ती बॅक पॅकर ट्रेव्हर्लर.नाही तिला लग्जरी ट्रॅव्हल करायला आवडते. तसेच तिला व्हेकेशनवर जाऊन रिलॅक्स करायला आणि शॉपिंग करायला आवडते. करिना याठिकाणी योग सेशनसुद्धा अटेंड करणार असल्याचे कळते आहे. ALSO READ : सैफ अली खान आणि करिना कपूर पुन्हा एकत्र दिसणार स्क्रिनवर स्वित्झर्लंडवरुन परतल्यावर करिना तिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे कामाला सुरुवात करण्याच्या आधी करिनाला तैमूर आणि सैफसोबत क्लॉलिटी टाईम स्पेंट करायचा आहे. प्रेग्नेंसीच्या आधी करिनाने रिया कपूरचा वीरे दी वेंडिंग चित्रपट साईन केला होता. मात्र प्रेग्नेंसी लीव्हमुळे या चित्रपटाची शूटिंग रखडली होती. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करतेय तर करिनासह यात सोनम कपूर आणि स्वरा भास्कर ही झळकणार आहे. सैफ अली खानचे कालाकांडी आणि सेफ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. करिना आणि सैफ एका अॅडमध्ये सुद्धा एकत्र दिसणार असल्याचे कळतेय.