Join us  

स्टुडंट आॅफ द इअर २ मध्ये टाईगरला लीड रोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 3:39 PM

स्टुडंट आॅफ द इअर’ मध्ये निर्माता करण जोहरने तीन नवीन अभिनेत्यांना लाँच केले होते, परंतु, सध्याला चित्रपट जसा बनत  ...

स्टुडंट आॅफ द इअर’ मध्ये निर्माता करण जोहरने तीन नवीन अभिनेत्यांना लाँच केले होते, परंतु, सध्याला चित्रपट जसा बनत  आहे, त्यामध्ये  टाइगर श्रॉफ यास लीड रोल मिळण्याची चर्चा आहे. या चित्रपटामुळे डेविड धवनचा मुलगा वरुण धवन, निर्माता महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.करण हा स्टुडंस आॅफ द इयरचा दुसरा पार्ट बनविण्याची तयारी करीत आहे. सूत्रानुसार चित्रपटाच्या  दुसºया पार्टसाठी टाइगरला आॅफर मिळाली आहे. त्यांनी हा चित्रपट अजूनही साईन केला नाही. परंतु, त्या आॅफरमुळे टाइगर खूप आनंदीत आहे.याअगोदर अभिनेता शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर व सैफ अली खानची मुलगी सारा हे लीड रोल करणार म्हणून चर्चा होती. शाहिद चा लहान भाऊ ईशान बॉलिवूड मध्ये पर्दापण करण्याची तयारीत आहे. त्यामुळे ईशानचे कुटुंबहीखूप आनंदीत आहे. परंतु, शाहिद त्याविषयी काहीही बोलायला तयार नाही.