Join us  

हातात बंदुक, डोळ्याला गॉगल... 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; ACP 'सत्या'च्या भूमिकेत अ‍ॅक्शन किंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 2:15 PM

रोहीतच्या 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफ हा झळकणार असून त्याचा पहिला लूक समोर आलाय.

अभिनेता अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण यांच्यानंतर आता रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडलीय. हा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ.  रोहीतच्या 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफ हा झळकणार असून त्याचा पहिला लूक समोर आलाय. अक्षय कुमारने सोशल मीडिया अकाउंटवरून टायगर श्रॉफचे 3 फोटो शेअर केले आहेत.

 सिक्स पॅक अॅब्स, हातात बंदुका, डोळ्याला गॉगल अशा दमदार लूकमध्ये टायगर दिसत आहे. टायगरचे फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले,'टायगर श्रॉफ माझ्या भावा ACP सत्या म्हणून तुझे आमच्या स्क्वॉडमध्ये स्वागत आहे.' याशिवाय, टायगर श्रॉफने सिनेमातील लुकचा फोटो शेअर केला आहे. यात त्याने लिहलं की, "ड्यूटीपर एसीपी सत्या रिपोर्टिंग सिंघम सर". 'सिंघम अगेन'मध्ये टायगरची एन्ट्री झाल्याचा चाहत्यांनाही आनंद झाला आहे. 

'सिंघम अगेन' चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. रोहितने चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सवर मोठी रक्कम खर्च केली आहे. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारत असल्याचे सांगण्यात येत आहे. करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण देखील या क्लायमॅक्सचा भाग असणार आहेत.

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'सिंघम'चित्रपट चांगलाच गाजला होता. रोहीत शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'सिंघम' हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सिंघम २’लाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्यामुळे 'सिंघम अगेन'बाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :टायगर श्रॉफबॉलिवूडअजय देवगणअक्षय कुमाररोहित शेट्टी