टायगर श्राॅफचा रॉकिंग अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
लोकमत समूहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता टायगर श्रॉफने मायकल जॅक्सन अंदाजात मूनवॉक आणि रोबोट स्टेप्स करत रसिकांची मनं जिंकली. मायकल जॅक्सनच्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
टायगर श्राॅफचा रॉकिंग अंदाज
लोकमत समूहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता टायगर श्रॉफने मायकल जॅक्सन अंदाजात मूनवॉक आणि रोबोट स्टेप्स करत रसिकांची मनं जिंकली. मायकल जॅक्सनच्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. मायकल जॅक्सनचे डायहार्ट फॅन असल्याचे टायगरनं आपल्या परफॉर्मन्समधून दाखवून दिले आहे. टायगर श्रॉफ स्टेजवर अवतरताच पुणेकरांनी एकच जल्लोष केला. पुण्याची शान असणारी पुणेरी पगडी परिधान केलेला टायगरचा मराठमोळा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला. पॉप संगीतावर थिरकताना मायकल जॅक्सनप्रमाणे केलेल्या डान्स स्टेप्स करत टायगरने उपस्थितांना अक्षरक्ष: वेड लावलं. यावेळी टायगरने चाहत्यांशी दिलखुलास संवाद ही साधला.