Join us

‘टायगर जिंदा है’मधील नर्स अनुप्रिया गोयंकाने म्हटले, ‘सलमानने बी स्ट्रॉन्ग म्हणत धीर दिला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:10 IST

सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ‘टायगर जिंदा है’मध्ये परिचारिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुप्रिया गोयंका हिचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. ...

सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ‘टायगर जिंदा है’मध्ये परिचारिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुप्रिया गोयंका हिचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. चित्रपटात दाखविण्यात आले की, अबू सलीम नावाचा आयएसआयएस लीडर भारत आणि पाकिस्तानातील ४० परिचारिकांना बंदी बनवितो. यासर्व परिचारिकांची टायगर म्हणजेच सलमान खान सुखरूप सुटका करतो. या परिचारिकांमध्ये अनुप्रियाने मुख्य परिचारिकेची भूमिका साकारली आहे. ती सलमानच्या या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये त्याची मदत करते. चित्रपटात अनुप्रियाच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. ज्या पद्धतीने तिने तिची भूमिका साकारली त्यावरून ती एक कसलेली कलाकार दिसत आहे. परंतु अनुप्रिया तिच्या या भूमिकेचे सर्व श्रेय सलमान खानला देऊ इच्छिते. तिच्या मते, सलमानशिवाय ही भूमिका साकारणे अशक्यप्राय झाले असते. चित्रपटाच्या सेटवर सलमानसोबत एक सीन शूट करतानाचा अनुभव सांगताना तिने म्हटले की, ‘आम्हाला एका बॉम्बसोबत बांधण्यात आले होते. त्यामुळे हा सीन करण्यासाठी मला आणि टीमला थोडासा वेळ लागला. सीनच्या सुरुवातीलाच मला एक खुर्चीवर बांधण्यात आले. माझ्या तोंडाची एक मोठी पट्टी बांधली गेली. पुढे  नकळतपणे माझ्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात झाली. माझी ही अवस्था बघून सलमानला खूपच वाइट वाटले असावे. तो माझ्याजवळ आला. त्याने मला म्हटले, ‘रडू नकोस... बी स्ट्रॉँग’! सलमानच्या या शब्दानंतर मी स्वत:ला सावरले अन् सीन पूर्ण केला. अर्थात यासाठी मला सलमानकडून प्रेरणा मिळाली. अनुप्रियाचा हा अनुभव पाहता टीमने केलेल्या मेहनतीला रंग येताना दिसत आहे. कारण अजूनही चित्रपटगृहांमध्ये ‘टायगर जिंदा है’चा जलवा कायम आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.