Join us

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ तामिळ-तेलगूमध्येही! पाहा, आमिर-अमिताभ यांचा ‘सरप्राईज’ व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 15:05 IST

अद्याप ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. पण त्याआधी अमिताभ-आमिरची जोडी एक मोठ्ठे सरप्राईज घेऊन आली आहे.

अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन सुपरस्टार्स ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे हे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे, असे आमिरने म्हटले होते. तूर्तास ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. अद्याप या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. पण त्याआधी अमिताभ-आमिरची जोडी एक मोठ्ठे सरप्राईज घेऊन आली आहे. होय, आमिर व अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, या सरप्राईजचा खुलासा केला. हे सरप्राईज काय तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट तामिळ आणि तेलगूमध्येही डब केला जाणार आहे. खुद्द आमिर आणि अमिताभ यांनी तेलगू व तामिळ भाषेतून याची घोषणा केली आहे.

ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक जारी करण्यात आले आहे. यात आमिर खान एका ‘फिरंगी’च्या रूपात आहे. अमिताभ यांनी खुदाबक्श नावाचे पात्र साकारले असून कॅटरिना कैफ हिने सुरैयाचे तर फातिमा सना शेख हिने जाफिराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दिवाळीच्या नंतरच्या सुट्टीच्या काळात बॉक्सआॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होणे अपेक्षित आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा  कुठलाही चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही  कुठलाही मोठा चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्सआॅफिसवर आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे मेकर्सही ही अपेक्षा धरून चालले आहेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट ५० कोटींचे ओपनिंग घेईल, अशी अपेक्षा मेकर्स बाळगून आहेत. 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानआमिर खानअमिताभ बच्चन