Join us

​ बॉलिवूड डेब्यूसाठी प्रभासने मागितले इतके कोटी! करण जोहरची झाली बोलती बंद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 11:11 IST

सन २०१७ च्या सुरुवातीला आलेल्या ‘बाहुबली2’ची प्रेक्षकांवर चढलेली झिंग अजूनही उतरायचे नाव नाही. या चित्रपटानंतर साऊथ स्टार प्रभास सगळ्यांच्या ...

सन २०१७ च्या सुरुवातीला आलेल्या ‘बाहुबली2’ची प्रेक्षकांवर चढलेली झिंग अजूनही उतरायचे नाव नाही. या चित्रपटानंतर साऊथ स्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झालायं. साहजिक हा सुपरस्टार कधी एकदा बॉलिवूडमध्ये दिसतो, असे चाहत्यांना झालेयं. खरे तर,‘बाहुबली2’ने प्रभासला मिळवून दिलेली लोकप्रीयता कॅश करत कुठला ना कुठला बॉलिवूड दिग्दर्शक प्रभाससोबत चित्रपट जरूर बनवणार, असेच सगळ्यांना वाटले होते. पण बरेच महिने लोटूनही याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसेनात म्हटल्यावर चाहतेही हिसमुसले. तिकडे प्रभासही आपल्या साऊथच्या चित्रपटात बिझीही झाला. अगदी सुरुवातीला करण जोहर दिग्दर्शक एस. एस. राजमौलीला सोबत घेऊन प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार अशी बातमी आली होती. पण हळूहळू ही बातमीही हवेत विरली. सगळ्यांसाठीच हे आश्चर्यकारक होते. प्रभासला बॉलिवूडमध्ये आणण्यास कुठलाही बॉलिवूड दिग्दर्शक का उत्सूक नाही, हेच सगळ्यांना कळेनासे झाले होते. पण अखेर याचे उत्तर मिळाले. होय, डिएनएने दिलेली बातमी खरी मानाल तर याचे कारण खुद्द प्रभास हाच आहे. होय, प्रत्यक्षात करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास अगदी तयार होता. त्याने याबद्दल  प्रभाससोबत चर्चाही केली होती. पण प्रभासने म्हणे, या प्रोजेक्टसाठी २० कोटी रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून करण जोहरची बोलतीच बंद झाली. मग काय, यानंतर करणने प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा आपला निर्णय मागे सोडला. बॉलिवूडचे अनेक बडे बडे स्टार्स घेत नाही, त्यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम प्रभासने मागितली होती. निश्चितपणे करणला यात कुठलाच फायद्याचा सौदा दिसेना.ALSO READ: काही तासांत पकडली गेली ‘बाहुबली’ प्रभासची ‘चोरी’! हॉलिवूडची केली कॉपी!!तूर्तास प्रभास आपल्या ‘साहो’ चित्रपटात बिझी आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे. अगदी काल-परवा या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. आता ‘साहो’नंतर प्रभास कुठला चित्रपट साईन करतो, ते बघूच.