Join us

यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:04 IST

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख (Shah Rukh Khan) केवळ त्याच्या अभिनयासाठी आणि चित्रपटांसाठीच नव्हे, तर इंडस्ट्रीत शानदार पार्ट्या आयोजित करण्यासाठीही ओळखला जातो. मात्र, यंदा तो 'मन्नत'मध्ये दिवाळी पार्टीचं आयोजन करणार नाहीये. यामागचं मोठं कारण समोर आलं आ

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख (Shah Rukh Khan) केवळ त्याच्या अभिनयासाठी आणि चित्रपटांसाठीच नव्हे, तर इंडस्ट्रीत शानदार पार्ट्या आयोजित करण्यासाठीही ओळखला जातो. 'किंग खान'च्या पार्टीत अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. तो दरवर्षी 'मन्नत' या त्याच्या बंगल्यावर दिवाळी पार्टीचं आयोजन करतो. त्याच्या या पार्टीला बॉलिवूडमधील सर्व मोठे सेलिब्रिटी उपस्थित असतात. मात्र, यंदा किंग खान 'मन्नत'मध्ये दिवाळी पार्टीचं आयोजन करणार नाहीये. यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, यावेळी शाहरुख खान दिवाळी पार्टी आयोजित करत नाहीये. यामागील कारण असं आहे की, 'मन्नत'मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नूतनीकरण  आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे. 

शाहरुख खान राहतोय भाड्याच्या घरात'मन्नत'मध्ये काम सुरू असल्यामुळे शाहरुख खान सध्या पत्नी गौरी खान आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासह मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत आहे. त्यांच्या 'मन्नत' घराचं नूतनीकरण पूर्ण झाल्यावर ते पुन्हा तिथे शिफ्ट होतील.

शाहरुख खान दिवाळी पार्टी देण्यासाठी इतका का प्रसिद्ध आहे, यामागचं कारणही जाणून घेऊया. खरं तर, आपल्या पार्टीत अभिनेता प्रत्येक व्यक्तीसोबत फोटो क्लिक करतो. इतकंच नव्हे तर, पार्टी संपल्यानंतर अभिनेता स्वतः प्रत्येकाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीचे फोटो पापाराझींना मिळत नाहीत. कारण, या पार्टीची सुरक्षा व्यवस्था खूप कडक असते. मात्र, शाहरुख खान पार्टीनंतर बाहेर येऊन पापाराझींना नक्कीच पोझ देतो.

यंदा आयुषमान खुराणाही देणार नाही पार्टी शाहरुख खान व्यतिरिक्त आणखी एक अभिनेता आहे, जो यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन करत नाहीये. तो म्हणजे आयुषमान खुराणा. सध्या हा अभिनेता त्याच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'थामा'च्या रिलीजच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No Diwali bash at Mannat this year: Here's why

Web Summary : Shah Rukh Khan will not host a Diwali party at Mannat this year due to ongoing renovations. The Khan family is currently residing in a rented apartment until the work is complete. Ayushmann Khurrana is also skipping his annual Diwali party.
टॅग्स :शाहरुख खानदिवाळी २०२५