Join us  

'शोले'साठी अमिताभ बच्चन नव्हेत, तर हा व्हिलन होता पहिली पसंती; अशी मिळाली बिग बींना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 9:08 AM

१९७५ साली रिलीज झालेला सुपरडुपर हिट चित्रपट 'शोले' (Sholey) हा बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

१९७५ साली रिलीज झालेला सुपरडुपर हिट चित्रपट 'शोले' (Sholey) हा बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या जय वीरूमधील जोडीने लोकांची मने जिंकली होती. पण तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.यापूर्वी हा चित्रपट इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती.

१९७५ मध्ये रिलीज झालेल्या रमेश सिप्पी यांच्या क्लासिकल हिट चित्रपट 'शोले'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आजही टीव्हीच्या पडद्यावर शोले दाखवला की लोक पडद्यावर चिकटून बसून चित्रपट पाहू लागतात. या चित्रपटाशी संबंधित कथा आजही लोकांच्या मनावर घर करून कायम आहेत. शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यातील मैत्रीने लोकांची मने जिंकली होती. याशिवाय अमजद खाननेही गब्बरच्या भूमिकेत इतिहास रचला होता. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही लोक विसरू शकलेले नाहीत. पण निर्मात्यांना या चित्रपटात अमिताभला नव्हे तर दुसरा नायक कास्ट करायचा होते. पण त्या अभिनेत्याच्या नकारानंतर हा चित्रपट अमिताभ यांच्याकडे गेला.

रमेश सिप्पीची जयच्या भूमिकेसाठी हा अभिनेता होता पहिली पसंतीMensXP च्या रिपोर्टनुसार, रमेश सिप्पी यांना 'शोले' या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी 'जय'च्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे नव्हते. त्या काळातील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी निर्मात्यांनी ही व्यक्तिरेखा लक्षात ठेवली होती. या चित्रपटासाठी त्यांची पहिली पसंती होती. मात्र शत्रुघ्न सिन्हा हे पात्र साकारू शकले नाहीत. नंतर ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्याकडे गेली. मात्र, अमिताभ बच्चन यांनी जयचे पात्र साकारून लोकांची मने जिंकली. या चित्रपटात धर्मेंद्रसोबत जय वीरूची जोडी खूप आवडली होती.

या कारणामुळे चित्रपट शत्रुघ्न सिन्हा यांच्या हातून निसटला.रमेश सिप्पी जेव्हा 'शोले' बनवत होते तेव्हा त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना 'जय'ची भूमिका ऑफर केली होती. मात्र त्यावेळी अभिनेत्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. वास्तविक शत्रुघ्न सिन्हा यांना दोन नायकांच्या चित्रपटात काम करायचे नव्हते. कुठेतरी त्यांना यात त्याच्या पात्राचे महत्त्व कमी दिसले असेल. त्यामुळे त्यांनी या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांचे नशीब फळफळले. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी अमिताभ यांचे नाव सुचवले होते, असे सांगितले जाते.

रमेश सिप्पी यांच्या 'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या जोडीने इतिहास रचला होता. या चित्रपटातील प्रत्येक पात्र घराघरात आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरले. या चित्रपटातून प्रत्येक पात्राला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचा अविस्मरणीय चित्रपट बनवला.

टॅग्स :अमिताभ बच्चनधमेंद्रशत्रुघ्न सिन्हा