Join us  

चॅलेंज! आरशासमोर उदास बसलेली ही मुलगी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलं का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:59 PM

Bollywood Actress : या फोटोत ही लहान मुलगी आरशासमोर बसलेली दिसत आहे. आरशासमोर ती उदास होऊन बसली आहे. अनेकजण या अभिनेत्रीला ओळखू शकलेले नाहीत.

Bollywood Actress : फॅन्सना बॉलिवूड स्टार्सची एक झलकही दिसली तरी ते दिवसभर आनंदात राहतात. आपल्या आवडत्या स्टार्सचे फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी फॅन्स सोशल मीडियावर त्यांची आतुरतेने वाट बघत असतात. अशात बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत ही लहान मुलगी आरशासमोर बसलेली दिसत आहे. आरशासमोर ती उदास होऊन बसली आहे. अनेकजण या अभिनेत्रीला ओळखू शकलेले नाहीत.

चला आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही अभिनेत्री बॉलिवूडच्या एका सुपरस्टारसोबत लिंक-अपवरून चर्चेत आहे. अजूनही ओळखलं नाही का? या अभिनेत्रीने 'दंगल' सिनेमात गीता फोगटची भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे फातिमा सना शेख. तिचा हा बालपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. 

फातिमा सना शेखच्या पर्सनल लाइफबाबत सांगायचं तर ती सध्या बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत आपल्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. फातिमा सना शेखने आमिर खानसोबत 'दंगल' सिनेमात काम केलं होतं. ज्यात ती आमिर खानची मुलगी बनली होती. आगामी काळात फातिमा सना शेख फील्ड मार्सल सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक सॅम बहादूरमध्ये दिसणार आहे. यात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :बॉलिवूडफातिमा सना शेख