Join us  

exclusive: 'ते आयुष्यभर मला त्रास देत राहणार'; इंडस्ट्रीबाहेरील 'या' दोन व्यक्ती देतायेत 'मलाल'फेम अभिनेत्याला त्रास?

By शर्वरी जोशी | Published: October 04, 2023 3:58 PM

Meezaan Jafri: मीजानने गंमतीने त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्ती त्याला सतत त्रास देतात असं म्हटलं आहे.

मीजान जाफरी (Meezaan Jafri) हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन राहिलेलं नाही. मलाल या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या मीजानने अल्पावधीत सिनेसृष्टीत त्याची जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे वडील, प्रसिद्ध अभिनेता असूनही त्याने त्यांची कोणतीही मदत न घेतला त्याचा फिल्मी प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे त्याच्या या गोष्टीचं सगळीकडूनच कौतुक केलं जातं. मीजान लवकरच 'यारियाँ 2' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने नुकतीच 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यावरही भाष्य केलं.

यारियाँ 2' या सिनेमात तीन भावंडांमधील मैत्री, प्रेम यांवर भाष्य केलं जाणार आहे. या सिनेमाविषयी बोलत असताना मीजानने त्याच्या सख्या भावंडांविषयीदेखील काही मजेशीर किस्से सांगितले. इतकंच नाही तर 'माझे भावंडं मला प्रचंड त्रास देतात, आणि आयुष्यभर देत राहतील', असं गंमतीने तो म्हणाला.

exclusive: जावेद जाफरीचा लेक 'या' दिग्दर्शकाला मानतो गुरु; त्यांच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब

'खऱ्या आयुष्यात तुमचं तुमच्या भावंडांसोबतचं नातं कसं आहे?' असा प्रश्न मीजानला विचारण्यात आला होता. यावर,  "मला दोन लहान भावंडं आहेत. एक बहीण आहे आणि एक भाऊ. पण ही दोन्ही भावंडं मला प्रचंड त्रास देतात. आणि, ते यापुढेही आयुष्यभर मला त्रास देत राहतील", असं मीजान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मुळात बहीण-भावंडांचं नातंच असं असतं. ते दोघं कायम मला लहान लहान गोष्टींवरुन त्रास देत असतात. पण, माझा मूड कधी खराब असेल तर मग माझ्यापासून चार हात लांबच राहतात. त्यांना माहितीये मी एखाद्या गोष्टीवरुन अपसेट असेल तर माझी खोडी काढायची नाही. मग, ते कितीही मस्तीच्या मूडमध्ये असले तरी माझी मस्करी करायला किंवा त्रास द्यायला येत नाही."

दरम्यान, मीजानला अलाविया आणि अब्बास ही दोन भावंडं आहेत. यात अलाविया सध्या फॅशन इंडस्ट्रीशी निगडीत आहे. परंतु, ती सुद्धा मीजान आणि वडील जावेद जाफरी यांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.  मीजान याचा यारीयाँ २ हा सिनेमा येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमापूर्वी त्याने मीजान याने आतापर्यंत काही मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'मलाल', 'हंगामा 2', 'मिरांडा बॉईज' या सिनेमांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर, 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या सिनेमांमध्येही त्याने छोटेखानी भूमिका साकारली आहे.

टॅग्स :मिजान जाफरीबॉलिवूडजावेद जाफरीसिनेमा