Join us  

बॉलिवूडमधून दिसेनासे झाले ‘हे’ स्टार्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 1:23 PM

बॉलिवूडमध्ये करिअर घडविणे आणि टिकवणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे. जरी या इंडस्ट्रीत एकदा संधी मिळाली असेल मात्र त्या संधीचे सोने करणे अर्थात करिअरचा उच्चांक गाठणे सर्व स्टार्सना शक्य नसते.

बॉलिवूडमध्ये करिअर घडविणे आणि टिकवणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे. जरी या इंडस्ट्रीत एकदा संधी मिळाली असेल मात्र त्या संधीचे सोने करणे अर्थात करिअरचा उच्चांक गाठणे सर्व स्टार्सना शक्य नसते. याचेच उदाहरण बॉलिवूडमधले काही स्टार्स आहेत. कालांतराने या अभिनेत्यांच्या लुकमध्येही आता बराच बदल झाला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्यांविषयी सांगतोय, जे दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत.* फरदीन खान

फरदीन प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा आहे. १२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये फरदीनने ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘फिदा’, ‘देव’, ‘नो एंट्री’, ‘हे बेबी’ आणि ‘आॅल द बेस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केले; पण त्याला हवे तसे यश मिळवता आले नाही.* चंद्रचूड सिंह

१९९६मध्ये आलेल्या ‘माचिस’ चित्रपटात झळकलेला अभिनेता चंद्रचूड सिंहला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पदार्पणाचा फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाला होता. चंद्रचूड अमिताभ बच्चन आणि सुनील दत्त यांना आदर्शस्थानी मानतो.* अपूर्व अग्निहोत्री२००४ मध्ये अभिनेत्री शिल्पा सखलानीसोबत अपूर्वचे लग्न झाले होते. त्याने फिल्मी करिअरमध्ये ‘प्यार कोई खेल नहीं, क्रोध, हम हो गए आपके, कसूर, प्यार दीवाना होता है, धुंध आणि लकीर’ या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय अनेक टीव्ही मालिकांमध्ये तो झळकला आहे.* हिमांशू मलिकहिमांशूने त्याच्या करिअरची सुरुवात नुसरत फतेह अली खान यांच्या 'आफरीन' या म्युझिक व्हिडिओतून केली होती. या व्हिडिओत अभिनेत्री लीजा रे त्याच्यासोबत झळकली होती. त्यानंतर तो सोनू निगमच्या 'दीवाना' या अल्बममध्ये गुल पनागसोबत झळकला होता. हिमांशूने २००१मध्ये आलेल्या 'तुम बिन' या सुपरहिट चित्रपटासह ख्वाहिश, एलओसी कारगिल, रक्त, रोग, रेन, कोई आप सा आणि मल्लिका या चित्रपटांमध्ये काम केले.* विकास भल्ला

विकास भल्ला अभिनेत्यासोबतच एक निर्माता आणि गायक आहे. तो ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. विकासने अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकचे शिक्षण घेतले आहे. ताकत, जियो शान से, साजिश, शिकार, प्यार में ट्विस्ट, अनकही, मैरीगोल्ड, चांस पे डांस आणि जय हो या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय अनेक टीव्ही मालिकांमध्ये तो झळकला आहे.

टॅग्स :बॉलिवूडफरदीन खानचंद्रचुर सिंग