‘या’ अभिनेत्रींनी एकत्र बेबी बम्प दाखवित शेअर केला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 21:27 IST
अभिनेत्री ईशा देओल आणि सेलेना जेटली प्रेग्नेंट असून, लवकरच या दोन्ही आई होणार आहे. अशात या दोघींनी बेबी बम्प दाखविणारा एक फोटो शेअर केला असून, त्यांच्या चाहत्यांकडून या फोटोला जबरदस्त पसंती मिळत आहे.
‘या’ अभिनेत्रींनी एकत्र बेबी बम्प दाखवित शेअर केला फोटो!
अभिनेत्री ईशा देओल आणि सेलेना जेटली प्रेग्नेंट असून, लवकरच या दोन्ही आई होणार आहे. अशात या दोघींनी बेबी बम्प दाखविणारा एक फोटो शेअर केला असून, त्यांच्या चाहत्यांकडून या फोटोला जबरदस्त पसंती मिळत आहे. वास्तविक दोघींनी एकत्र फोटो शेअर करावा, अशी त्यांच्या चाहत्यांचीच इच्छा होती. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. ईशा देओल पहिल्यांदाच आई होणार असून, सेलेना दुसºयांदा जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यामुळे या दोघींच्याही परिवारात सध्या आनंदाचे वातावरण असून, दोघींना एकत्र बघणे त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. सेलेनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट हा फोटो शेअर केला आहे. फोटोला नेटिझन्सकडून सातत्याने लाइक्स आणि कमेण्ट दिल्या जात आहेत. दरम्यान, देओल परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. ईशाची आई हेमा मालिनी आणि वडील धर्मेंद्र ईशाची विशेष काळजी घेत आहेत. हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून ही बातमी शेअर केली होती. त्याचबरोबर आजी होणार असल्याचा आनंदही त्यांनी यावेळी बोलून दाखविला होता. तर सेलेनाने या अगोदर जुळ्या मुलांना जन्म दिला असून, पुन्हा ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. बॉलिवूडमधून या दोघी सध्या गायब आहेत. दोघीही त्यांच्या संसारात व्यस्त असून, पुन्हा बॉलिवूडमध्ये परतील की नाही याविषयी शंका आहे. परंतु त्यांच्यातील मैत्री घनिष्ठ असून, या फोटोवरून ती अजूनही टिकून आहे, हेच अधोरेखित होते.