Join us

'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:57 IST

चाहत्यांचे अफाट प्रेम मिळालेल्या 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल बनविण्याचा विचार नाही, असे चित्रपट दिग्दर्शकाने   सांगितले.ते म्हणाले, 'सिक्वेल'वर माझा फारसा ...

चाहत्यांचे अफाट प्रेम मिळालेल्या 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल बनविण्याचा विचार नाही, असे चित्रपट दिग्दर्शकाने   सांगितले.ते म्हणाले, 'सिक्वेल'वर माझा फारसा विश्‍वास नाही. यातून फार काही साध्य होते, असे मला वाटत नाही. 'एक था टायगर' नंतर ते प्रथमच सलमानसोबत 'बजरंगी..'मध्ये एकत्र आले होते. काही भूमिका कायम स्मरणात राहणार्‍या असतात. बजरंगीची भूमिकाही अशीच आहे, असे त्यांना वाटते.कबीर खान सध्या एका दुसर्‍या चित्रपटाच्या नियोजनात व्यस्त आहेत. चित्रपटाची संकल्पना आणि कथासुत्रावर काम सुरू आहे. मात्र त्यात कोण भूमिका करणार या बाबतीत त्यांने अद्याप काहीही सांगितले नाही. दिग्दर्शनाच्या आपल्या खास शैलीसाठी कबीर प्रसिद्ध आहे.