Join us  

So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:25 AM

Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे.

आलिया भट स्टारर (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ ( Gangubai Kathiawadi) हा सिनेमा रिलीज होऊन अडीच महिन्यांचा काळ लोटला आहे. भारतातील चित्रपटगृहांतून हा चित्रपट कधीच उरतला. पण ओटीटीवर रिलीज झाला अन्  थायलंडमध्ये या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनंथायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. आता थायलंडच्या या आज्जीबाईलाच बघा. आलियाचा गंगूबाई लुक कॅरी करत, तिने धम्माल पोझ दिल्या आहेत. सध्या या आजीच्या गंगूबाई स्टाईल फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक जण तिच्या प्रेमात पडले आहेत.

या आज्जीबाईचा गंगूबाई लुक खुद्द आलियाने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. ‘थायलंडच्या लोकांकडून अफाट प्रेमाचा वर्षाव होतोय... आभार....,’ असं आलियाने ही इन्स्टास्टोरी शेअर करताना लिहिलं आहे.

थायलंडच्या आजीबाई गंगूबाईच्या प्रेमातथायलंडच्या या आजीबाई तर गंगूबाईच्या प्रेमात ठार वेड्या झाल्या आहेत.  हांगथोंग नावाच्या या आजीबाईचे गंगूबाई स्टाईलमधील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माथ्यावर मोठी लाल टिकली, डोक्यावर ओढणी, डोळ्यांवर गंगूबाई स्टाईल गॉगल, हातात पर्स घेऊन या आजीबाईंनी मस्तपैकी पोझ दिल्या आहेत. हांगथोंग आजीबाईचे इन्स्टावर 11000 फॉलोअर्स आहेत. त्यांना गंगूबाई स्टाईलमधला व्हिडीओही जबरदस्त आहे.

 थायलंडमध्ये नंबर 1संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’  या सिनेमानं भारतीय बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. तिथेही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. विशेषत: थायलंडमध्ये गेल्या आठवड्यात हा सिनेमा नंबर 1 वर रँक करत होता. ‘गंगूबाई काठियावाडी’  हा ओटीटीवर 13.81 मिलियन तास पाहिला गेला. कॅनडा, युनायटेड किंगडम, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सह देशभरातील 25 देशात टॉप मोस्ट 10 चित्रपटांमध्ये याचा समावेश आहे. गेल्या 26 एप्रिलला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता.
टॅग्स :आलिया भटथायलंडसिनेमासंजय लीला भन्साळीबॉलिवूड