Join us

Teaser Out : श्रद्धा कपूरच्या ‘हसीना’चा टीजर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 21:06 IST

​अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मोस्ट अवेटेड ‘हसीना’ या चित्रपटाचे टीजर आज रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या मोस्ट अवेटेड ‘हसीना’ या चित्रपटाचे टीजर आज रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. आतापर्यंत रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये झळकलेली श्रद्धा एकदमच अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या बहिणीच्या भूमिकेत बघावयास मिळणार असल्याने, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे. दरम्यान, टीजरमध्ये हसीना म्हणजेच श्रद्धाचा अंदाज बघण्यासारखा असून, गुन्हेगारीच्या जगतात ती कशी ओढली जाते हे दिसून येत आहे. टीजरमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, पतीच्या निधनानंतर हसीनाचे आयुष्यच  बदलून जाते. जेव्हा दाउद भारतातून पसार होतो, तेव्हा मुंबईतील सर्व अवैध धंदे हसीनाचा पती सांभाळतो. पुढे त्याचे निधन होते अन् ही जबाबदारी हसीना स्वत:वर घेते. गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत असताना, ती या जगतातील महाराणी होत जाते. मात्र हे करीत असताना तिच्यावर तब्बल ८८ गुन्हे दाखल होतात. परंतु अशातही ती केवळ एकदाच न्यायालयात हजर होते. हसीना न्यायालयात उपस्थित होतानाची घटना या एक मिनिटाच्या टीजरमध्ये दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्वा लखिया यांनी केले आहे, तर नाहिद खान निर्माता आहेत. चित्रपटात श्रद्धा कपूरचाच भाऊ सिद्धांत कपूर दाउद इब्राहिमच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. पहिल्यांदाच हे दोघे बहीण-भाऊ स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत श्रद्धा कपूरने म्हटले होते की, मी अपेक्षा करते की, भाऊ-बहिणीची बॉण्डिग चित्रपटात बघावयास मिळेल. श्रद्धाने म्हटले होते की, या चित्रपटामुळे मी थोडीसी नर्व्हस आहे. कारण चित्रपटात काही सीन्स करताना मला विसरावे लागेल की तो माझा भाऊ आहे. पण काहीही असो आतापर्यंत रिलीज झालेल्या पोस्टर आणि टीजरमध्ये या दोघा बहीण-भावाची बॉण्डिग जमली असेच म्हणावे लागेल. सुरुवातीला हा चित्रपट १४ जुलै रोजी रिलीज होणार होता, परंतु आता रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले असून, १८ आॅगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.