Join us  

तारा सुतारियाने बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, अभिनेत्रीचा बीचवरील बोल्ड फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:28 PM

ताराने तिचा एक बोल्ड बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे.

 बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने आपला 25वा वाढदिवस काल अर्थात गुरुवारी साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी तारा बॉयफ्रेंड आदर्श जैनसोबत मालदीवला गेली आहे. मालदीवमधून ताराने तिचा फोटो शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडते. ताराने तिचा एक बोल्ड बिकिनीमधला फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत तारा सुतारियाने लाल रंगाची बिकिनी घातली असून ती बीचजवळ हॉट पोज  देताना दिसतेय. 'बीच / बर्थडे बेबी.' असे कॅप्शन ताराने या फोटोला दिले आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ताराचा बॉयफ्रेंड आदर जैनसुद्धा त्याचा बीचवरचा शॉर्ट्समधला एक फोटो शेअर केला आहे. दोघे सध्या मालदीवमध्ये व्हॅकेन्शन एन्जॉय करतायेत. आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे.

.आदरचे करियर अद्याप सुरू झाले नाही आहे. तर ताराने २०१९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आताच तिने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे. मात्र त्यांच्या लग्नासाठी काहीही अडचण नाही. आता ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत 'आरएक्स 100' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. तसेच टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती 2'मध्येही झळकणार आहे.

टॅग्स :तारा सुतारिया