Join us

तनुश्री दत्ता झाली स्लिम ट्रिम, ताजे फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 15:58 IST

तनुश्री पुन्हा चर्चेत आली आहे. पण कुठल्या वादामुळे नव्हे तर तिच्या बदललेल्या लूकमुळे.

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली.

सन 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा  धक्कादायक आरोप तिने केला आणि ती चर्चेत आली. तिच्या या आरोपासोबतच बॉलिवूडमध्ये मीटू मोहिम सुरु झाली. आता तनुश्री पुन्हा चर्चेत आली आहे. पण कुठल्या वादामुळे नव्हे तर तिच्या बदललेल्या लूकमुळे.होय, चबी अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाणारी तनुश्री सध्या चांगलीच स्लिम ट्रिम व फिट दिसू लागली आहे. गेल्या काही महिन्यांत तनुश्रीने तिचे 10 किलो वजन कमी केले आहे. आपल्या नव्या लूकचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत.

 २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. पण तिचे हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘अपार्टमेंट’ सिनेमात तनुश्री अखेरची झळकली होती.

या अपयशामुळे तनुश्री नैराश्यातून  डिप्रेशनमध्ये गेली आणि अध्यात्माच्या मार्गावर निघाली. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला. बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केले.

दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेसुद्धा तनुश्री आणि अध्यात्माचा संबंध कायम राहिला. सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केले जाते.  

टॅग्स :तनुश्री दत्ता