Join us  

'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर रचला हा विक्रम, केले इतके कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 12:57 PM

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची घौडदोड बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे.

ठळक मुद्दे या चित्रपटाने या आठवड्यात सोमवारी 8.17 कोटी, मंगळवारी 7.72, बुधवारी 7.09 कोटी, गुरुवारी 7.02 कोटी आणि शुक्रवारी 5.38 कोटी इतके कलेक्शन करत आता 202 कोटी इतके दमदार कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे.

अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले. या चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू असला तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घौडदौड सुरूच आहे. या चित्रपटाचे बजेट हे 150 करोड रुपये इतके होते आणि आता या चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ विकेंडलाच नव्हे तर इतर दिवशी देखील हा चित्रपट खूपच चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने या आठवड्यात सोमवारी 8.17 कोटी, मंगळवारी 7.72, बुधवारी 7.09 कोटी, गुरुवारी 7.02 कोटी आणि शुक्रवारी 5.38 कोटी इतके कलेक्शन करत आता 202 कोटी इतके दमदार कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे.

बॉक्स ऑफिसवर 200 कोटीहून अधिक कमाई करणारा 2020 मधील 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच एक हिट चित्रपट बॉलिवूडला मिळाला आहे.

दमदार अ‍ॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.

अजयने यात मराठा वीर योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.

‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. काजोल, अजय देवगण, देवदत्त नागे, शरद केळकर आणि सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत छोट्या छोट्या भूमिकेत असलेले कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

टॅग्स :तानाजीअजय देवगणकाजोलसैफ अली खान देवदत्त नागेशरद केळकर