Join us  

कोरोनामुक्त झाल्यानंतर कुटुंबासह असे केले तमन्ना भाटियाने सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:40 PM

कोरोनामुक्त झाल्यानंतर कुटुंबासह तमन्ना केक कटिंग करत सेलिब्रेशन केले. कोरोनामुक्त झाल्याचा आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. तमन्नाने हा व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे.

तमन्ना भाटियालाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी तमन्नाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी तमन्नाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. काही दिवसांनी मात्र तमन्नालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हैद्राबादमध्ये तिच्यावर उपाचार सुरू होते.  

5 ऑक्टोबरला तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर तिने घरातच क्वॉरंटाईन करून घेतले होते. आता ती ठणठणीत बरी झाली आहे. तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कुटुंबासह तमन्नाने केक कटिंग करत सेलिब्रेशन केले. कोरोनामुक्त झाल्याचा आनंद  तिच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. तमन्नाने हा व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. 

ऑगस्ट महिन्यांत तमन्नाने एक पोस्ट शेअर करत तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. माझ्या आईवडिलांमध्ये कोव्हिड 19 ची काही लक्षणे दिसली होती. यानंतर आम्ही लगेच टेस्ट केल्यात. दुदैवाने माझ्या आईवडिलांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आमच्या कुटुंबातील अन्य सदस्य निगेटीव्ह आहेत, असे तिने सांगितले होते.

तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता. एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. 

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी! 

गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाला आहे. सध्या त्या होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याआधी ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. अनेक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत.

टॅग्स :तमन्ना भाटिया