Join us  

तमन्ना भाटिया म्हणते, हृतिक रोशनसाठी काय पण! ‘नॉन किसींग क्लॉज’ तोडायलाही तयार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 4:17 PM

हृतिकसोबत काम करण्याची संधी मिळाली तर चित्रपटात चुंबन न घेण्याचा करार मोडण्यास तयार असल्याचे तमन्नाने म्हटले आहे.

ठळक मुद्दे२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘चाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला.

‘बाहुबली द बिगिनिंग’ अर्थात ‘बाहुबली’ या सिनेमात बाहुबलीच्या खांद्याला खांदा लावून युद्ध आणि प्रेमाच्या मैदानात लढणा-या अवंतिकाची भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला लोक साऊथची अभिनेत्री म्हणून ओळखतात. पण फार कमी लोकांना ठाऊक असेल की, तमन्ना ही हिंदी चित्रपटसृष्टीनेच दिलेली नायिका आहे. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली होती. हीच तमन्ना एका खास अटीवर चित्रपट साईन करते. होय, आॅनस्क्रिन किसींग सीन न देण्याच्या अटीवर तमन्ना कुठलाही चित्रपट साईन करते. पण एका बॉलिवूड अभिनेत्यासाठी मात्र ही अट शिथील करण्यास तमन्ना तयार आहे. होय, केवळ आणि केवळ हृतिक रोशनसाठी तमन्ना ‘चुंबन करार’ तोडण्यास तयार आहे.

अलीकडे फेमसली फिल्मफेअर या चॅट शोमध्ये खुद्द तमन्नाने हा खुलासा केला. मी पडद्यावर चुंबन दृश्य देत नाही. कुठलाही चित्रपट असो, तो साईन करण्यापूर्वी मी निर्मात्यांसोबत तसा करार करते. पण हृतिक रोशन माझा हिरो असेल तर मी हा करारही तोडायला तयार आहे, असे तमन्ना यावेळी म्हणाली.

तमन्ना ही हृतिक रोशनची डाय-हार्ट फॅन आहे. याआधीही अनेकदा तिने हे सांगितले आहे. अलीकडे तमन्ना हृतिकला भेटली होती. त्याबद्दलही तिने सांगितले. तिने सांगितले की, हृतिकला भेटले तो क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. एकेदिवशी अचानक हृतिक व मी एकमेकांसमोर आलोत. मी त्यला हाय केले. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. तुला भेटून खूप आनंद झाला, असे मी त्याला म्हणाले. त्याने केवळ ओके म्हटले आणि तो समोर गेला. पण काही पाऊल समोर गेल्यानंतर तो अचानक थांबला आणि मागे वळून, तुला माझ्यासोबत फोटो हवा, असे त्याने मला विचारले. अर्थात मी होकार दिला. त्याक्षणी जणू मी १६ वर्षांची आहे, असे मला वाटले. 

२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘चाँद सा रोशन चेहरा’ या सिनेमातून तमन्नाने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला. दक्षिणेकडील सिनेमात तिची प्रत्येक तमन्ना म्हणजेच इच्छा पूर्ण झाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. 

टॅग्स :तमन्ना भाटियाहृतिक रोशन