Join us  

तापसी पन्नूचा 'थप्पड' फोडणार महिलांवरील घरगुती हिंसाचाराला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 6:00 AM

तापसी पन्नूच्या 'थप्पड' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

बॉलिवूडची पिंक गर्ल म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच हटके सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता ती एका वेगळ्या विषयावर आधारीत चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव 'थप्पड' असे असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले आहे.

 'थप्पड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने एक अशी महिला साकारली आहे जी आपल्या पतीद्वारे घरगुती हिंसेची शिकार झाल्यानंतर न्यायाची लढाई लढते.  या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये आपल्या नावासोबत आपल्या आईचे नाव जोडून आपल्या आईला आणि सर्व महिलांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली आहे. तसेच या चित्रपटातून घरगुती हिंसेला सहन करू नका असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात येत आहे. 

थप्पड चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत आहेत. याआधी तापसी आणि अनुभव यांनी २०१८ साली मुल्क चित्रपटासाठी एकत्रित काम केले आहे. थप्पड २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटा व्यतिरिक्त तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तापसी शाबाश मिट्ठू या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या जीवनावर आधारीत आहे.

शाबाश मिट्ठूचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :थप्पडतापसी पन्नू