Join us  

तापसी पन्नूच्या झोळीत पडला आणखी एक स्पोर्ट्स सिनेमा, पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:14 PM

तापसी पन्नू लवकरच आणखी सपोर्ट्स विषयाशी संबंधीत सिनेमात दिसणार आहे.

तापसी पन्नू लवकरच आणखी सपोर्ट्स विषयाशी संबंधीत सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. आरएसवीपी निर्मित 'रश्मि रॉकेट' या चित्रपटाच्या शूटिंगला २६ मार्चपासून मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे.  

तापसी यात रश्मिची भूमिका साकारणार आहे जी वेगवान धावण्याची शक्ति असलेली कच्छच्या वाळवंटातली तरुणी आहे. 'सूरमा' आणि 'सांड की आंख'नंतर ही तिची तीसरी स्पोर्ट्स जॉनरचा सिनेमा आहे. या व्यतिरिक्त तापसी ‘शाबाश मिठू’मध्ये देखील दिसणार आहे, जो क्रिकेटर मिताली राजवर आधारित चित्रपट आहे.

दो महिन्या आधीपासूनच तापसीने आपल्या भूमिकेसाठी तयारी सुरु केली होती.तापसीने विनिल मैथ्यूद्वारे निर्देशित आपल्या आगामी रोमांस थ्रिलर 'हसीन दिलरुबा'च्या सेटवर रश्मिसाठीचे प्रशिक्षण सुरु केले होते.

‘रश्मि रॉकेट’चे दिग्दर्शक आकर्ष खुराना म्हणाले की, या चित्रपटाचे शूटिंग आम्ही तीन भागात करणार आहोत. कच्छ नंतर आम्ही मे महिन्यात दिल्ली आणि जूनमध्ये देहरादून नंतर मसूरीमध्ये शूटिंग करणार आहोत. कच्छचे वाळवंट आमच्या शूटिंग कार्यक्रमाचा महत्वपूर्ण भाग असणार आहे. इथल्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात एका गाण्याने होते जो कच्छ मधल्या एका उत्सवाचा भाग आहे."

टॅग्स :तापसी पन्नू