Join us  

Shabaash Mithu Movie : 'शाब्बास मिथू'! टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजाच्या चित्रपटाचं पोस्टर OUT

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:23 PM

Shabaash Mithu Movie : शाब्बास मिथू चित्रपटाचे धमाकेदार फर्स्ट पोस्टवर आऊट झाले आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे ठणकावून सांगणारी धाकड गर्ल, जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही महिला क्रिकेटपटूंचा आदर करावासा वाटला तिचं नाव आहे मिताली राज. मितालीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय. यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. 'शाबास मिथू' असे या बायोपिकचे नाव आहे. मिथूचे फर्स्ट पोस्टवर आऊट झाले आहे. यात तापसीच्या हातात बॅट दिसतेय. तापसी सध्या करिअरच्या शिखरावर आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमा तापसी बॉलिवूडला देते आहे.तापसीने फर्स्ट पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच मितालीने देखील ट्विटरवर पोस्टर शेअर केले आहे. दिग्दर्शक राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

महिला क्रिकेटला यश, प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणारी मिताली राज ही पहिली क्रिकेटपटू ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर तापसी लवकरच थापडमध्ये दिसणार आहे. तसेच तापसी एथलिट रश्मिची भूमिका देखील साकारणार आहे. आता तापसी मितालीची भूमिका रुपेरी पडद्यावर कशी साकारतेय याची उत्सुकता दोघींच्या फॅन्सना आहे.

टॅग्स :तापसी पन्नूमिताली राजशाबास मिथू