Join us  

मुझे जवाब चाहिए...! निर्मात्यांवर खवळली तापसी पन्नू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 1:49 PM

गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

ठळक मुद्देतापसीच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडेला या चित्रपटासाठी साईन करण्यात आल्याची खबर आहे. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.

गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. होय, कार्तिक आर्यन स्टारर ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये तापसी पन्नूची वर्णी लागली होती. पण ऐनवेळी, अगदी अखेरच्या क्षणी निर्मात्यांनी तापसीला बाद करत, दुसºया अभिनेत्रीला साईन केले. विशेष म्हणजे, याबद्दल तापसीला कुठलीही कल्पना देण्यात आली आहे.

मुंबई मिररशी बोलताना तापसीने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. मला अगदी शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी आपला निर्णय कळवला. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी मला चित्रपटातून का काढण्यात आले, याबद्दल काहीही सांगितले नाही. केवळ तुझ्याजागी दुसरी अभिनेत्री निवडली गेलीय, एवढेच त्यांनी मला सांगितले. मी निर्मात्यांशीही बोलले पण त्यांच्याकडून मला कुठलेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या सगळ्या प्रकारामुळे मला प्रचंड मनस्ताप झाला. शिवाय माझे शेड्यूलही बिघडले. यानंतर कुठलाही चित्रपट साईन करण्यापूर्वी मी चारदा विचार करेल. ‘पति पत्नी और वो’ने माझे डोळे उघडले, असे तापसी म्हणाली.

तापसीच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडेला या चित्रपटासाठी साईन करण्यात आल्याची खबर आहे. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. अनन्या पांडे लवकरच ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करतेय. काही दिवसांपूर्वी अनन्या कार्तिक आर्यनसोबत डिनर डेट एन्जॉय करताना दिसली होती. यानंतर तूर्तास दोघांच्याही अफेअरच्या चर्चा आहेत.

टॅग्स :तापसी पन्नूकार्तिक आर्यनअनन्या पांडे