Join us

'तलवार' थरारक अनुभव -विशाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:40 IST

नि र्माता लेखक विशाल भारद्वाज सध्या आपल्या आगामी 'तलवार' या चित्रपटाबाबत अत्यंत उत्साही आहे. त्यांच्या मते, या चित्रपटाची कथा ...

नि र्माता लेखक विशाल भारद्वाज सध्या आपल्या आगामी 'तलवार' या चित्रपटाबाबत अत्यंत उत्साही आहे. त्यांच्या मते, या चित्रपटाची कथा म्हणजे एक भयावह अनुभव आहे. विशाल म्हणाला की,' नोएडा मध्ये २00८ साली झालेल्या डबल र्मडर केसच्या पहिल्या तपासणी अधिकार्‍यांनी त्याला ही कथा लिहिण्यासाठी प्रेरीत केले होते. त्यानंतर जपानी चित्रपट 'रसोमोन' चे दिग्दर्शक अकिरा कुरूसोवा यांच्याकडुन प्रेरणा घेऊन त्याने ही कथा लिहिण्यास सुरूवात केली. आरूषी आणि तिचे आईवडील यांच्यावर आधारित ही कथा आहे. विशालच्या मते, ही सत्य घटना जशीच्या तशी त्याला प्रेक्षकांसमोर ठेवायची होती. त्यामुळे या कथेत त्याने स्वत:च्या मनाने काहीही टाकले नाही. ही कथा जर आपल्यावर आपबिती झाली असती तर किती भयानक झाले असते या विचारानेही विशालला भिती वाटते.