Join us

-म्हणून अभिनेत्री स्वरा भास्करने मागितली सुशांतच्या कुटुंबीयांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 14:28 IST

जाणून घ्या काय म्हणाली स्वरा भास्कर

ठळक मुद्देकंगना म्हणाली होतीबी-ग्रेड अ‍ॅक्ट्रेस; स्वराने दिले होते असे उत्तर

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमच्या मुद्यावरून रोज नवे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वप्रथम कंगना राणौतने नेपोटिजमचा मुद्दा उचलून धरला. सुशांतने आत्महत्या केली नसून बॉलिवूडमधील घराणेशाहीचा तो बळी ठरला. त्याची आत्महत्या नसून हत्या आहे, असे कंगना म्हणाली. ती इथेच थांबली नाही तर  एका ताज्या मुलाखतीत तिने नेपोटिजमचा मुद्दा सोडून स्वरा भास्कर व तापसी पन्नू या दोन अभिनेत्रींवरही निशाणा साधला. स्वरा व तापसी बी ग्रेड अभिनेत्री असल्याचे कंगना म्हणाली. कंगनाने बी-ग्रेड म्हणतात तापसी व स्वरा खवळल्या आणि दोघींनीही कंगनाला फैलावर घेतले. यावरून तिघींमध्ये ट्विटर वॉर सुरु झाले. मात्र याचदरम्यान स्वराने सुशांतच्या कुटुंबीयांची माफी मागितली.

‘आत्मनिरीक्षण करण्याची खरे तर हीच वेळ आहे. आपल्याला सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांची माफी मागण्याची गरज आहे. आपल्या वादात सुशांतच्या नावाचा अनेकदा उल्लेख झाला आणि यासाठी आपल्याला सुशांतच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी. सुशांतचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि सुशांत आपल्यात नाही. अशावेळी आपल्याला त्याच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. आपल्याला नम्र व्हायला पाहिजे,’ असे ट्विट  स्वराने केले.

 

कंगना म्हणाली होतीबी-ग्रेड अ‍ॅक्ट्रेस; स्वराने दिले होते असे उत्तर‘मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल  आणि हे सगळे जण  आमचे करण जोहरवर प्रेम आहे असे म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात? तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? असे कंगना म्हणाली होती. यावर स्वराने तिला उपरोधिक उत्तर दिले होते. ‘गरजू, आऊटसाइडर, बी-ग्रेड अ‍ॅक्ट्रेस मात्र आलिया व अनन्याच्या तुलनेत चांगले... माझ्या मते ही कॉम्प्लिमेंट आहे. थँक्स कंगना, तू एक चांगली अभिनेत्री व व्यक्ती आहे. नेहमी अशीच शाईन कर,’ असे स्वरा म्हणाली होती.

टॅग्स :स्वरा भास्करसुशांत सिंग रजपूत