Join us  

स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा 'दोबारा अलविदा' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 9:38 PM

स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा 'दोबारा अलविदा' हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

स्वरा भास्कर आणि गुलशन देवैयाचा दोबारा अलविदा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. दुरावलेले प्रेमी एकाच कॅबमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यानंतर होणारा आठवणींचा प्रवास यावर हा लघुपट आधारित आहे. या लघुपटात स्वरा भास्कर आणि गुलशन देवैया यासारखे नावाजलेले कलाकार असून शशांक शेखर सिंग हे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मस् प्रस्तुत दोबारा अलविदा लघुपटात आधुनिक काळातील नातेसंबंध व त्यामधील असणारी अस्थिरता दर्शविणार्‍या रंजक कथा एकाच कॅबमधून प्रवास करणार्‍या अचानकपणे भेटलेल्या दोन दुरावलेल्या प्रेमींभोवती फिरते. त्यानंतर दडपलेल्या भावनांचे होणारे चढ-उतार आणि दुरावलेल्या प्रेमींमध्ये पुन्हा एकदा निर्माण होणारी ओढ याबाबतच रंकज कथा आहे.

दोबारा अलविदा लघुपटाबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाल्या की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे,कारण यामध्ये नातेसंबंध संपल्यानंतर सहसा दडपलेल्या भावनांचे हे पैलू समोर येतात. आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट बंद झाल्यावर क्वचितच आपण त्या गोष्टीचा सामना करतो. मला आनंद आहे की,रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मस ने अशा अनोख्या कथा सांगण्यासाठी व आधुनिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यासपीठ दिले आहे.

कलाकार गुलशन देवैया म्हणाले की, ही कथा काही विशिष्ट अशा प्रकारच्या भावनांशी संबंधित आहे ज्या सर्वसाधारणपणे दडपून टाकल्या जातात. किंवा बाजूला टाकल्या जातात. जोपर्यंत आपल्याला त्यांच्याशी अचानक सामना करण्यास भाग पाडत नाही. या कथेत अनपेक्षितपणे दोन व्यक्तींना परस्परांशी भावनिकदृष्ट्या जोडले जाण्यासाठी एक संधी मिळते. अशा प्रकारची अतिशय उत्तम आणि समकालीन विषयांशी संबंधित कथाकारांसाठी सक्षम व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मस् यांचा आभारी आहे. या लघुपटामुळे उत्कृष्ट दर्जाचे निर्माते,कलाकार व तंत्रज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. शाहबाझ खान यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रख्यात संगीत दिग्दर्शक कृष्णा सोलो यांचे संगीत लाभले असून मानस मित्तल यांनी चित्रपटाचे संपादन केले आहे.

टॅग्स :स्वरा भास्करगुलशन देवैया