Join us

सुझान खानच्या बहिणीने सोशल मीडियावरील वातावरण तापविले, हॉट फोटो केले शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 22:13 IST

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिची बहीण फराह अली खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. होय, फराहने सोशल ...

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिची बहीण फराह अली खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. होय, फराहने सोशल मीडियावर असे काही हॉट फोटो शेअर केले ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फराहचे हे फोटो खूपच हॉट असल्याने तिने सोशल मीडियावर वातावरण अक्षरश: तापविले आहे. वास्तविक फराह खान फार क्वचित चर्चेत असते. अशात तिच्या या बोल्ड फोटोशूटमध्ये ती प्रचंड चर्चेत आली आहे. फराहने तिचे हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फराह अली खान व्यवसायाने डिझायनर असून, इन्स्टाग्राम ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिच्या फॉलोअर्सची संख्या २,६९,००० इतकी आहे. आतापर्यंत तिने सहा हजारांपेक्षा अधिक फोटो तिने अपलोड केले आहेत. खरं तर सोशल मीडियावर आणि बॉलिवूड वर्तुळात फराह अली खान चांगलीच फेमस आहे. तिने अपलोड केलेले फोटो बघून कुणी म्हणणार नाही की, फराह ४७ वर्षांची आहे. फराहने १९९९ मध्ये प्रसिद्ध डीजे अकील याच्यासोबत विवाह केला होता.