Join us  

रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ! सुनैनाबद्दल बोलली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:25 AM

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर  केला होता.

ठळक मुद्दे सुनैनाचा फोन लागत नाहीये. सुनैनाच्या कुटुंबाने तिच्यासोबत काय केले, देवच जाणो. मी सध्या खूप घाबरलेली आहे, असे ट्विट रंगोलीने केले.

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर  केला होता. अलीकडे पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना खुद्द सुनैना हिनेही रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले . माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या कुटुंबाने केवळ माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा. जेणेकरून माझे आयुष्य पुन्हा सुंदर होईल, असे सुनैनाने यावेळी स्पष्ट केले.

सुनैनाच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. अशात हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिने सुनैनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ‘ रोशन कुटुंब माझ्या अतिशय जवळचे होते. त्यामुळे सुनैना एक अतिशय प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती आहे, हे मला माहित आहे. दुर्दैवाने ती सध्या एका विचित्र स्थितीत सापडली आहे. सुनैनाचे पापा सध्या त्यांच्या प्रकृतीसंबधित समस्यांशी झुंज देत आहेत. तिची आई सध्या काहीही बोलण्यास असमर्थ आहे. कृपया अशा कठिण स्थितीत या कुटुंबाला सहकार्य करावे. प्रत्येक कुटुंब कधी ना कधी कठीण समस्यातून जाते. मी हे सांगतेय कारण, दीर्घकाळ मी या कुटुंबाचा भाग होते,’असे सुजैनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.रंगोलीचे आणखी एक ट्विटयाचदरम्यान कंगनाची बहीण रंगोली हिने एक नवे ट्विट केले आहे. सुनैनाचा फोन लागत नाहीये. सुनैनाच्या कुटुंबाने तिच्यासोबत काय केले, देवच जाणो. मी सध्या खूप घाबरलेली आहे, असे ट्विट रंगोलीने केले.

यानंतर फिल्म ट्रेड एक्स्पर्ट सुमित कडेल यांच्या एका ट्विटच्या उत्तरादाखल रंगोलीने आणखी एक ट्विट केले. ‘सुनैना तिच्या कुटुंबावर अवलंबून आहे. १६ वर्षांच्या वयात तिचे लग्न झाले होते. तिच्याकडे ना कुठली डिग्री आहे ना योग्य शिक्षण. पोलिसांकडे जाणेही इतके सोपे नाही. कारण कंगना यातून गेली आहे. राकेश रोशन यांचे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत. त्यांनी क्राईम ब्रँचला कंगनाच्या मागे लावले होते. महिला आयोगानेही कंगनाची तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. सुनैना तिच्याच घरात छळ सहन करतेय. कृपया तिला चुकीच्या पद्धतीने जज करू नका,’ असे रंगोलीने लिहिले.

 

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खानकंगना राणौत