Join us  

अँजिओप्लास्टीला एक महिना पूर्ण, सुश्मिता सेनने शेअर केला Video; म्हणाली, 'मी हा दिवस...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:40 AM

47 वर्षीय सुश्मिता सेन तिच्या पर्सनल लाईफमुळेच सध्या जास्त चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. 47 व्या वर्षीही ती कमालीची फिट आहे. तरी गेल्या महिन्यात तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं तिने सांगितलं आणि चाहत्यांना धक्काच बसला. हार्टअटॅकनंतर अँजिओप्लॅटीला एक महिना झाल्याचं सांगत तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

सुश्मिता सेन तिच्या पर्सनल लाईफमुळेच सध्या जास्त चर्चेत आहे. आधी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, नंतर ललित मोदीसोबत अफेअर आणि लग्नाच्या चर्चा आणि आता हृदयविकाराचा झटका असं सतत तिच्या आयुष्यात काही ना काही सुरु आहे. तसंच ती सोशल मीडियावर फिटनेस संदर्भात फोटो व्हिडिओ अपलोड करत असते. फिटनेसबाबत इतकी जागरुक असूनही तिला हार्टअटॅकचा सामना करावा लागला. आता सुश्मिताने ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'अँजिओप्लास्टी होऊन एक महिना झाला. मला जे सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे 'काम' करत मी दिवस साजरा करतीये.  लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन.' व्हिडिओला बॅकग्राऊंडमध्ये तिने तिचं आवडतं गाणं लावलं आहे.

सुश्मिताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत. तिला असंच फिट राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुश्मिताच्या 'आर्या' या वेबसिरीजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. तिचं अभिनय क्षेत्रातील जबरदस्त कमबॅक बघून चाहतेही खूश झालेत.

टॅग्स :सुश्मिता सेनहृदयविकाराचा झटकाबॉलिवूडसोशल मीडिया