Join us

Sushmita Sen : सुष्मिता सेन व रोहमन शॉलचं पॅचअप? फॅमिली पार्टीत दिसला एक्स-बॉयफ्रेन्ड, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:31 IST

Sushmita Sen : बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन व ललित मोदी यांच्या लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. अशात आता एक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन (Sushmita Sen) व ललित मोदी ( Lalit Modi ) यांच्या लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. कपल एकमेकांच्या प्रेमात आहे. खुद्द ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, याचा खुलासा केला होता. खरं तर  सुष्मिता व ललित मोदींचं नातं अद्यापही लोकांना पचलेलं नाही. खुद्द सुष्मिता सुद्धा यावर स्पष्ट काही बोललेली नाही. अशात आता एक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. होय, या व्हिडीओत सुष्मिता तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत  (Rohman Shawl) पार्टी करताना दिसली.

नुकताच सुष्मिताची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुष्मिता, तिच्या मुली शिवाय एक्स बॉयफ्रेन्ड रोहमन दिसत आहे.

रोहमन सुष्मिताच्या मुलींसोबत मस्ती-मज्जा करतोय. व्हिडीओ एका लाईव्ह सेशनमधील आहे. तूर्तास हा व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंंचावल्या आहेत. सुष्मिता व रोहमनचं पॅच अप झालं की काय? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. असं असेल तर ललित मोदींचं काय? असा प्रश्नही नेटकºयांना पडला आहे.

काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर सुष्मिताने तिचे रोहमन शॉलशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून ललित मोदींशी असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगच्या वृत्तावर रोहमन शॉलने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. ‘त्यांना आनंदी राहू द्या, प्रेम ही एक सुंदर भावना आहे.  जर त्यांनी एकमेकांना निवडलं असेल तर ते एकमेकांना अनुरुप आहेत. एखाद्यावर हसून तुम्हाला आनंद मिळत असेल तर नक्कीच हसा. याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हाला होतोय. प्रेम पसरवा, द्वेष नाही,’ असं रोहमन म्हणाला होता.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉलललित मोदी