Join us  

सुशांतचा व्हिसेरा अहवाल आठवडाभर लांबणीवर! सीबीआय, सीएफएसएलची संयुक्त बैठक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 3:18 AM

गेला महिनाभर मुंबईत तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक बुधवारी दिल्लीला परतले. शेकडो तासांचा तपास व अनेकांकडे कसून चौकशी करूनही सुशांतची हत्या झाली, याबाबत एकही पुरावा मिळू शकेला नाही.

- जमीर काझीमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या व्हिसेराचा अहवाल आठवडाभर लांबणीवर पडला आहे. अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) पुढील आठवड्यात तो सीबीआयकडे सादर करेल. या प्रकरणी तपास पथकातील फॉरेन्सिक एक्स्पर्टसमवेत संचालक मंडळाची बैठक होईल. यात अहवालाचा अंतिम निष्कर्ष नोंदविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.गेला महिनाभर मुंबईत तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक बुधवारी दिल्लीला परतले. शेकडो तासांचा तपास व अनेकांकडे कसून चौकशी करूनही सुशांतची हत्या झाली, याबाबत एकही पुरावा मिळू शकेला नाही. त्यामुळे त्याला कट करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले का, याच अंगाने तपासावर भर दिला जात आहे. त्यासाठी सुशांतचा व्हिसेरा पुन्हा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या पोटात विषाचा अंश होता का, याची पडताळणी केली जाईल.कूपर रुग्णालयातून व्हिसेरा ताब्यात घेऊन फेरतपासणीसाठी तो दिल्लीतील एम्सकडे ७ सप्टेंबरला पाठविला आहे. अहवाल बनविण्यासाठी तेथील फॉरेन्सिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची टीम आहे.कसलीही संदिग्धता नसेलसीबीआयचे विशेष तपास पथक आणि सीएफएसएल तज्ज्ञांशी चर्चा करून केवळ तथ्य आणि पुरावा यावर आधारित अहवाल बनविला जाईल, त्यामध्ये कसलीही सांदिग्धता असणार नाही, असे डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग