Join us  

सुशांत मृत्यू प्रकरणातील चावीवाल्याला आला होता संशय, केला हा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:55 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीची सीबीआय सातत्याने चौकशी करत आहे. सुशांतच्या खोलीचा लॉक तोडणाऱ्या चावीवाल्याचाही सीबीआयने जबाब नोंदवला आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत अनेक लोकांचे स्टेटमेंट घेतले आहे. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, सीबीआयने सिद्धार्थ पिठानीने लॉक तोडण्यासाठी बोलवलेल्या चावीवाल्यालाही बोलवले होते. त्याने काही हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, 14 जूनला चावीवाल्याला बोलवले होते. सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीने दरवाजा खोलण्यासाठी बोलवले होते. रिपोर्ट्सनुसार चावीवाल्याने दावा केला आहे की पिठानीने त्याला आधी चुकीच्या लॉकचा फोटो पाठवला होता. त्यानंतर त्याने योग्य दरवाजाचा फोटो मागितला जेणेकरून लॉक ओपन होईल. त्याने हेदेखील सांगितले की, दरवाजा खोलल्यावर त्याला आत पाहू दिले नाही आणि पैसे देऊन जायला सांगितले. त्यामुळे त्याला गडबड असल्याचा संशय आला होता.

सीबीआयने चावीवाल्याचे बुधवारी स्टेटमेंट नोंदवण्यात आले. त्या दिवसाबद्दल त्याच्याशी डिटेलमध्ये चौकशी केली जाऊ शकते. 

सुशांतची बहिण मीतू सिंगनेदेखील आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, जेव्हा ती सुशांतच्या घरी पोहचली तेव्हा त्याची बॉडी खाली उतरवली होती. तिने सांगितले होते की सिद्धार्थ पिठानी आणि त्याच्या साथीदाराने चाकूने कपडा कापून बॉडी खाली उतरवली असे सांगितले. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग