Join us

सुशांतसिंग म्हणतो,‘ काय पो चे ’ एक जादुई अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 21:41 IST

अभिषेक कपूर यांचा तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘काय पो चे’. अभिनेता सुशांतसिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध ...

अभिषेक कपूर यांचा तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘काय पो चे’. अभिनेता सुशांतसिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध हे त्यांच्या ‘काय पो चे ’ चित्रपटाच्या शूटिंगला ‘जादूई अनुभव’ म्हणत आहेत. लेखक चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाईफ’ या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘काय पो चे’ हा चित्रपट असून इशान, ओमी, गोविंद या तीन मित्रांची ही कथा आहे. त्यांना क्रीडा क्षेत्रात त्यांचे स्वत:चे दुकान आणि अकॅडमी सुरू करू इच्छितात. त्यांची मैत्री धर्म, राजकारण आणि समाजातील द्वेषासमोर टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे शेवट दुर्देवी आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये चित्रपट रिलीज झाला आहे. सुशांतने टविटरवर पोस्ट केले आहे की,‘ मॅजिकल एक्सपिरियन्स ईट वॉज...थ्री ईअर्स आॅफ ‘काय पो चे’ अभिषेक कपूर, अमित साध आणि राजकुमार राव.’ त्यानंतर राजकुमारने टिवट केले की, ‘सच अ वंडरफुल मेमरीज...थ्री ईअर्स आॅफ ‘काय पो चे’! अमितनेही ‘थँक’ म्हणून रिटिवट केले आहे. याशिवाय अम्रिता पुरी ही अभिनेत्री देखील यात होती. }}}}