Join us

​सुशांत सिंह राजपूत निघाला ‘नासा’ला...आता ‘चंदा मामा’ दूर नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:16 IST

सुशांत सिंह राजपूत सध्या ‘राबता’ या आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण केवळ इतकेच नाही ‘राबता’च्या प्रमोशनसोबत ‘चंदा ...

सुशांत सिंह राजपूत सध्या ‘राबता’ या आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण केवळ इतकेच नाही ‘राबता’च्या प्रमोशनसोबत ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाची तयारीही त्याने सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून सुशांत लवकरच ‘नासा’ला रवाना होणार आहे. सुशांतसिंह तसा इंजिनिअर.  म्हणजे त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. पण ही पदवी आत्ता कुठे त्याच्या कामी येणार आहे. होय, नासाला जो तो जाणार आहे. त्यामुळे सुशांत कमालीचा उत्सूक आहे. याबद्दल तो सांगतो, मी सायन्सचा विद्यार्थी. सायन्स हा माझ्या आवडीचा विषय. पुढे मी इंजिनिअरिंग केले. माझ्या अ‍ॅक्टिंग प्रोफेशनमध्ये माझ्या या शिक्षणाची मदत होईल, असे मला कल्पनेतही वाटले नव्हते. पण ती होतेय. ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात माझ्या शिक्षणाचा वापर होणार आहे. या चित्रपटाच्या तयारीचा भाग म्हणून मी लवकरच नासात जाणार आहो. येथे मी फ्लार्इंग लायसन्सही घेणार. माझ्यासोबतचे अनेक इंजिनिअर मित्र अद्यापही नासात जाऊ शकलेले नाही आणि मी इंजिनिअर नसताना नासात जाणार आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल.  माझ्या कामाद्वारे मी जगाला एक्सप्लोर करू शकतो. म्हणून माझ्या कामावर माझे प्रचंड प्रेम आहे. चंद्रावरचे जग कसे असेल, याबद्दल मला पूर्वापार कुतूहल राहिले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी एका वेगळ्या जगाबद्दल जाणून घेऊ शकेल. यापेक्षा इंटरेस्टिंग दुसरे काय असू शकेल, असेही तो म्हणाला.ALSO READ : ​सुशांत सिंह राजपूत बनणार चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर!एकंदर काय, तर सुशांत सध्या प्रचंड आनंदात आहे. नासामधून परतल्यावर तो ‘चंदा मामा दूर के’चे शूटींग करणार आहे. यात सुशांत एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार आहे.आता नासातील ट्रेनिंगचा सुशांतला किती फायदा होतो, ते आपण बघूच.